महानिर्मितीचा साक्री-1 प्रकल्प: उर्जा क्षेत्रात नवीन क्षितिजे खुली
Solar Energy Project Government of Maharashtra
महाराष्ट्र शासन सातत्याने नैसर्गिक संसाधनाच्या माध्यमातून Solar Energy Project Government of Maharashtra वीजनिर्मिती करण्यसाठी आग्रही आहे. शाश्वत विकासाच्या दृष्टीकोनातून नैसर्गिक स्त्रोतांच्या माध्यमातून होणारी वीज निर्मिती म्हणजे शाश्वत विकासाचा दैदिप्यमान घटक आहे. जाल्स्त्रोतांचा वापर करून वीजनिर्मिती करण्यापेक्षा सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून उर्जा निर्माण करण्याचा स्त्रोत हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. सक्री शिवारात महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नातून 25 सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे, याविषयी सविस्तर माहिती पुढे वाचूया.
संक्षिप्त बातमी Solar Energy Project Government of Maharashtra
– महानिर्मितीचा साक्री-१ सौर ऊर्जा प्रकल्प : 25 मेगावॉट क्षमतेचा सौर प्रकल्प यशस्वीरीत्या कार्यान्वित करण्यात आला आहे.
– एकूण सौर ऊर्जा क्षमता: महानिर्मितीची एकूण स्थापित सौर ऊर्जा क्षमता आता 428 मेगावॉट आहे.
– प्रकल्प तपशील:
– स्थान: शिवाजीनगर, साक्री तालुका, धुळे जिल्हा.
– एकूण नियोजित क्षमता: 70 मेगावॉट (साक्री-1: 25 मेगावॉट, साक्री-2: 25 मेगावॉट, साक्री-3: 20 मेगावॉट).
– विकसक: म/s गोदरेज आणि बॉयस.
– तंत्रज्ञान: क्रिस्टलाईन सौर पॅनेल.
– कॅपॅसिटी युटीलायझेशन फॅक्टर (सी.यू.एफ.): 20.59%.
– वार्षिक वीज निर्मिती: 45.09 दशलक्ष युनिट अपेक्षित.
– जमीन संपादन: 52 हेक्टर.
– प्रकल्प खर्च: ₹93.12 कोटी.
– ऊर्जा विक्री: उत्पादित वीज खुल्या बाजारात विकली जाईल.
– संचालनाची तारीख: 21 ऑगस्ट 2024.
– रोजगार: साक्री-1 प्रकल्पामुळे 50 लोकांना रोजगार मिळाला आहे.
– साक्री सोलर हब: साक्री-1 पूर्ण झाल्यावर साक्रीकडे एकत्रित 195 मेगावॉट सौर ऊर्जा क्षमता असलेला हा सौर प्रकल्प साक्रीला “सोलर हब” म्हणून प्रसिद्ध करेल.
– ऊर्जा व्यापार: जुलै 2024 पासून, महानिर्मितीने पुण्यातील SEZ बायोटेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडसोबत 15 मेगावॉट सौर वीज वितरण करार केला आहे.
– उत्साहवर्धक प्रकल्प:
– साक्री-2: 25 मेगावॉट सौर प्रकल्प टाटा पॉवर सोलर सिस्टिम्सद्वारे.
– साक्री-3: 20 मेगावॉट सौर प्रकल्प म/s स्वरयू पॉवरद्वारे.

महानिर्मितीने धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील शिवाजीनगर येथे एकूण 70 मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामध्ये साक्री-1 (25 मेगावॉट), साक्री-2 (25 मेगावॉट) आणि साक्री-3 (20 मेगावॉट) चा समावेश आहे.
क्रिस्टलाईन पद्धतीचे सौर पॅनेल
यापैकी साक्री-1 येथे 25 मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम मेसर्स गोदरेज आणि बॉयस या विकासकाने इ.पी.सी. (अभियांत्रिकी खरेदी आणि उभारणी तत्वावर) हा प्रकल्प विकसित केला असून क्रिस्टलाईन पद्धतीचे सौर पॅनेल आहेत. या प्रकल्पाची कॅपॅसिटी युटीलायझेशन फॅकटर (सी.यू.एफ.) 20.59 टक्के असून वार्षिक वीज निर्मिती 45.09 दशलक्ष युनिट अपेक्षित आहे.
21 ऑगस्ट रोजी हा सौर प्रकल्प कार्यान्वित करून 220/33 के.व्ही. शिवाजीनगर, साक्री उपकेंद्राशी यशस्वीरित्या जोडण्यात आला. साक्री-1 प्रकल्पामुळे 50 लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आता महानिर्मितीची एकूण सौर ऊर्जा स्थापित क्षमता 428 मेगावॉट इतकी झाली आहे.
साक्री-1 प्रकल्पाची वैशिष्ट्ये :
या प्रकल्पासाठी 52 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून याचा प्रकल्प खर्च 93.12 कोटी इतका आहे. या प्रकल्पातून उत्पादित वीज ही खुल्या बाजारात विकण्यात येणार आहे.
“साक्री” महानिर्मितीचे सोलर हब
साक्री येथे महानिर्मितीचा 125 मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प मागील सुमारे दहा वर्षांपासून कार्यरत आहे. त्यात साक्री-1,2,3 सौर प्रकल्प पूर्ण झाल्यावर एकाच ठिकाणी सुमारे 195 मेगावाट स्थापित क्षमता असलेल्या या सौर प्रकल्पामुळे साक्री महानिर्मितीचे “सोलर हब” म्हणून नावारूपास येणार आहे.
महानिर्मिती पॉवर ट्रेडिंग क्षेत्रात
जुलै 2024 पासून महानिर्मितीने सेझ बायोटेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड,पुणे समवेत 15 मेगावॉट सौर वीज वितरणाचा करार केला आहे.
प्रगतीपथावर सौर ऊर्जा प्रकल्प
साक्री-1 येथे 25 मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचे काम मेसर्स गोदरेज एन्ड बोएस कंपनी तर साक्री-2 हा 25 मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प टाटा पॉवर सोलर सिस्टिम , साक्री-3, हा 20 मेगावॉट स्थापित क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचे काम मेसर्स स्वरयू पॉवर करीत असून लवकरच हे दोन्ही प्रकल्प कार्यान्वित होणे अपेक्षित आहे.
ऊर्जामंत्र्यांनी केले महानिर्मितीचे अभिनंदन
साक्री-1 येथे 25 मेगावॉट स्थापित क्षमतेचा हा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री यांनी महानिर्मिती अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन यांनी संचालक(प्रकल्प) अभय हरणे आणि (नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प आणि नियोजन)चमुचे तसेच मेसर्स गोदरेज एन्ड बॉयस च्या अधिकारी, अभियंत्यांचे अभिनंदन केले आहे.
25 मेगावॉट क्षमतेचा हा सौर उर्जा प्रकल्प हा अत्यंत महत्वाचा आणि नवी क्षितिजे उघडली आहेत.
हेही वाचा >>> https://sarkaribatmya.in/padma-award-2025/
फॉलो करा फेसबुक पेज >>> https://www.facebook.com/profile.php?id=61556645477169