‘लाडकी बहीण’ योजनेचा अनुभव, सणांची गोडी वाढली
महाराष्ट्र सरकारने अलीकडेच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर केली होती Mukhyamantri ladki Bahin Yojna Important Effects. या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना महिन्याकाठी त्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यात येणार आहेत. या योजनेमुळे महिलांच्या आयुष्यात अद्वितीय बदल झाले आहेत. ग्रामीण भागात रोजंदारी करणाऱ्या महिलांसाठी हि योजना संजीवनी ठरली आहे. महिन्याचा प्राथमिक खर्च भागवण्याची चिंता आता मिटली आहे अशी भावना सवर्सामान्य महिला सरकारी बातम्यांच्या प्रतिनिधींशी बोलताना देत आहेत.या योजनेमुळे सणांची गोडी वाढल्याची भावनिक प्रतिक्रिया करा.
संक्षिप्त बातमी Mukhyamantri ladki Bahin Yojna Important Effects
– योजना लाभ:
– मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांना आर्थिक मदतीचा लाभ मिळाला आहे.
– महिलांना शैक्षणिक खर्च, आरोग्य आणि स्वप्नपूर्तीसाठी रक्कम वापरण्याची सुविधा मिळाली आहे.
– कार्यक्रमाचे तपशील:
– वचनपूर्ती सोहळा आर्णी रोडवरील किन्ही परिसरात हजारो महिलांनी सहभाग घेतला.
– बंजारा व आदिवासी समाजाच्या महिलांनी पारंपारिक वेशभूषेत भाग घेतला आणि नृत्य सादर केले.
– महिलांचे अनुभव:
– निशा राठोड:
– रक्षाबंधनच्या एक दोन दिवस आधी बँक खात्यात पैसे जमा झाल्याने चिंता कमी झाली.
– सणाच्या तयारीसाठी पैसे मिळाल्यामुळे आनंद व्यक्त केला.
– सुनीता रामटेके:
– योजनेतून मिळालेल्या तीन हजार रुपयांचा वापर मुलांच्या भविष्यासाठी करण्याची भावना व्यक्त केली.
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
– श्वेता चव्हाण:
– योजनेच्या मदतीने शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास मिळाले.
– सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांबद्दल आभार व्यक्त केले.
– संगीता चव्हाण:
– शेत मजुरी करणाऱ्या संगीता चव्हाण यांना आर्थिक मदतीमुळे संसाराला सहाय्य झाले.
– पैशांचा वापर मुलींसाठी शैक्षणिक साहित्य व कपडे खरेदीसाठी केला जाणार आहे.
– योजनेची नियमित सुरूवात ठेवावी, अशी भावना व्यक्त केली.

भगिनींना हक्काच्या आधारासह आर्थिक बळ मिळाले
महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून Mukhyamantri ladki Bahin Yojna Important Effects अनेक भगिनींना हक्काच्या आधारासह आर्थिक बळ मिळाले आहे. बँक खात्यात आलेल्या रक्कमेतून मुलांचा शैक्षणिक खर्च, आरोग्य विषयक बाबींसह आपल्या स्वप्नपूर्तीसाठी योजनेतून मिळालेल्या रक्कमेचा विनियोग करता येईल, अशी भावना आज मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत वचनपूर्ती सोहळ्यात आलेल्या बहिणींनी व्यक्त केली.
भगिनी पारंपारिक वेषभुषेत कार्यक्रमात सहभागी झाल्या
वचनपूर्ती सोहळा कार्यक्रमाच्या निमित्ताने आर्णी रोड स्थित किन्ही परिसरातील मैदानावर हजारोंच्या संख्येने महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावागावातून महिलांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. बंजारा व आदिवासी समाजाच्या भगिनी पारंपारिक वेषभुषेत कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. Mukhyamantri ladki Bahin Yojna Important Effects तसेच यावेळी आदिवासी व बंजारा समाजबांधवांनी पारंपारिक नृत्य सादर केले.
लाडक्या भावाने हक्काचे पैसे दिले
कार्यक्रमात सहभागी झालेल्या बहीणींच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांच्यातील आत्मविश्वास दर्शवत होता. Mukhyamantri ladki Bahin Yojna Important Effects आता आम्हीही कुणावर अवलंबून नाही, आमच्या लाडक्या भावाने आम्हाला आमचे हक्काचे पैसे दिले, ही भावना त्यात होती. यावेळी महिला भगिनी हात उंचावून मोबाईल टार्च लावून त्यांची आत्मनिर्भरता दर्शवित होत्या. त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
रक्षाबंधनचा सण गोड झाला – निशा राठोड
दिग्रस तालुक्यातील वडगाव येथील निशा रोहिदास राठोड यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचा आनंद त्यांच्या डोळ्यात दिसत होता. ‘ रक्षाबंधनच्या एक दोन दिवस आधीची घटना. सण जवळ आला होता, पण हातात पैसे नव्हते, खूप चणचण होती, मुलीला कपडे, शैक्षणिक साहित्य घ्यायचे होते.
राख्या खरेदी केलेल्या नव्हत्या आणि इतक्यात…माझ्या फोनवर बँक खात्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचा मेसेज आला….!” आणि माझी चिंता मिटली….‘ अशा शब्दात भावना व्यक्त करताना त्यांचे डोळे पाणावले होते. निशा राठोड यांच्यासारख्याच यवतमाळ जिल्ह्यातील लाखो महिला लाडक्या बहिणी ठरल्या आहेत. त्यातील काही मोजक्या भगिनींच्या या बोलक्या प्रतिक्रिया….
भेट भावाची, ठेव मुलांच्या भविष्याची – सुनीता रामटेके
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण‘ योजना सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानते. या योजनेचा अर्ज करताना मला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही.
माझ्या खात्यात बरोबर तीन हजार रुपये जमा झाले. Mukhyamantri ladki Bahin Yojna Important Effects या योजनेतून मिळालेले पैसे भावाची भेट म्हणून माझ्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वापरणार आहे, अशी भावना व्यक्त केली आर्णी तालुक्यातील लोणी येथील सुनीता रामटेके यांनी. अशीच प्रतिक्रीया लोणी येथील रहिवासी मिना शिंदे यांनी देऊन मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार मानले.
कल्याणकारी योजनांची शिदोरी – श्वेता चव्हाण
शासनाने केवळ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ दिला नसून महिलांना अनेक कल्याणकारी योजनांची शिदोरी दिली. या योजनांच्या मदतीने आम्ही आमचे आरोग्य, शैक्षणिक आणि आर्थिक गरजा पूर्ण करणार आहोत.
Mukhyamantri ladki Bahin Yojna Important Effects लाडकी बहीण योजनेतून मिळालेली रक्कम ही मुलांचे शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी उपयोगी पडली. त्याबद्दल मी शासनाचे मनापासून आभार मानते, अशी भावना दिग्रस तालुक्यातील वडगाव येथील रहिवासी श्वेता विठ्ठल चव्हाण यांनी व्यक्त केली.
संसाराला हातभार लाभला – संगीता चव्हाण
मी शेत मजुरीचे काम करते. घरात नेहमी पैश्याची चणचण भासत होती. आता माझ्या बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. या पैशांची संसाराला मदत होईल. Mukhyamantri ladki Bahin Yojna Important Effects माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी हे पैसे अडचणीच्या काळात नक्की उपयोगी पडतील.
या पैश्यातून मी माझ्या चारही मुलींसाठी शैक्षणिक साहित्य व कपडे खरेदी करणार आहे. योजनेतून पैसे मिळाल्या निमित्त मी मुख्यमंत्री महोदयांची खूप खूप आभारी आहे. ही योजना अशीच नियमितपणे सुरु राहावी, अशी भावना व्यक्त केली दिग्रस तालुक्यातील वडगाव तांड्याच्या संगीता भाऊराव चव्हाण यांनी.
हेही वाचा >>> https://sarkaribatmya.in/mumbai-contribute-5-trillion-dollar-economy-india/
फॉलो करा फेसबुक पेज >>> https://www.facebook.com/profile.php?id=61556645477169