म्हाडाची घरे झाली 15 ते 20 टक्क्यांनी स्वस्त,19 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार I MHADA’s Homes Price Reduce by 20 Percent

ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृतीसाठी १९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ MHADA’s Homes Price Reduce by 20 Percent 

म्हाडाची घरे म्हणजे सर्व सामान्यांना परवडणारी घरे असतात. म्हाडाचे घर घेणं हे प्रत्येक सर्वसामान्यांचं स्वप्न असते.  या घरांची किंमत अलीकडेच वाढवण्यात आल्या होत्या. सर्वसामान्यांचा रोष पहाता या घरांची घरे स्वस्त करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. परिणामी आता मुंबई मंडळातील 370 घरांच्या विक्रीच्या किंमतीत तब्बल 15 ते 20 टक्क्यांनी कपात केली आहे. या बरोबरच अर्ज प्रक्रियेला देखील 19 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. यामुळे म्हाडा चे घर घेण्यासाठी प्रयत्न करणारे सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.

संक्षिप्त बातमी

विक्रीच्या किंमतीत खालील प्रमाणे कपात करण्यात आलेली आहे :
– ‘म्हाडा’ मुंबई मंडळातर्फे 370 सदनिकांच्या विक्री किंमतीत 10 ते 25 टक्क्यांपर्यंत कपात.
– अत्यल्प उत्पन्न गटातील किंमती 25 टक्क्यांनी कमी.
– अल्प उत्पन्न गटातील किंमती 20 टक्क्यांनी कमी. MHADA’s Homes Price Reduce by 20 Percent
– मध्यम उत्पन्न गटातील किंमती 20 टक्क्यांनी कमी.
– उच्च उत्पन्न गटातील किंमती 10 टक्क्यांनी कमी.

अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ:
– ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृतीसाठी मुदतवाढ: 19 सप्टेंबर 2024 पर्यंत.

नवीन शुभंकर चिन्हाचे अनावरण:
– आधुनिक तंत्रज्ञान युगात जनसंवाद सुलभ व पारदर्शक ठेवण्यासाठी म्हाडाचे शुभंकर चिन्हाचे अनावरण.

संगणकीय सोडतीचे दिनांक व ठिकाण:
– प्राप्त अर्जाची संगणकीय सोडतीची तारीख व ठिकाण लवकरच जाहीर केले जाईल.

– उपस्थित अधिकारी:
– गृहनिर्माण मंत्री अतुल सावे MHADA’s Homes Price Reduce by 20 Percent
– म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल
– मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर
– इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर
– अन्य संबंधित अधिकारी व सदस्य.

सरकारी बातम्या आणि निवडणुकीविषयीचे UPDATE मिळवण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा.

33 (5) व 33 (5) व 58 अंतर्गत  MHADA’s Homes Price Reduce by 20 Percent पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला डेव्गृहलपर्स कडून गृहसाठा या स्वरूपात प्राप्त झालेले 370 घरे विक्रीस काढण्यात आलेली आहे. या घरांच्या विक्री किंमती 10 ते 25 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्या आहेत. ‘म्हाडा’ च्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीतील विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत हि घरे विक्रीस काढण्यात आली आहेत.

महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली. म्हाडाच्या मुंबई मंडळ येथील घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु आहे. या घरांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरण्यासाठी 19 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. नवीन व मागील सोडतीतील या सदनिका पुनर्विकास प्रोजेक्ट डेव्हलपर्सकडून म्हाडाला गृहसाठयाच्या स्वरुपात घरे प्राप्त झाली आहेत.

अत्यल्प उत्पन्न गटातील घरांच्या किंमती 25 टक्क्यांनी, अल्प उत्पन्न गटातील म्हाडाच्या घरांच्या किंमती 20 टक्क्यांनी तर मध्यम उत्पन्न गटातील घरांच्या किंमती 15 टक्क्यांनी स्वस्त करण्यात आली आहेत. MHADA’s Homes Price Reduce by 20 Percent तर उच्च उत्पन्न गटातील घरांच्या किंमती 10 टक्क्यांनी कमी करण्यात करण्यात आल्या आहेत. अशी माहिती अतुल सावे यांनी यावेळी दिली.

म्हाडाच्या घरांविषयी तसेच लॉटरी विषयी सर्व नागरिकांशी संवाद करता यावा यासाठी म्हाडाच्या त=वतीने शुभंकर चिन्हाचे देखील यावेळी अनावरण करण्यात आले. MHADA’s Homes Price Reduce by 20 Percent  अलीकडच्या अत्याधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये म्हाडाच्या पटलावर असलेल्या नागरिकांशी संवाद सहजरित्या व्हावा तसेच पारदर्शक सुकर व्हावा या दृष्टीने म्हाडाच्या वतीने तयार केलेल्या शुभंकर चिन्हाचे (Mascot) अनावरण म्हाडा मुख्यालयात करण्यात आल्याची माहितीत मिळाली.

           यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे सी ई ओ मिलिंद शंभरकर, चीफ इंजिनियर धीरजकुमार पंदिरकर, चीफ इंजिनीअर   शिवकुमार आडे यांची उपस्थिती होती.

सदर घरांची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे.  सदर प्राप्त अर्जाची कॉप्युटर पद्धतीने  सोडतीचा दिनांक व ठिकाण मंडळातर्फे लवकरात लवकरच जाहीर करण्यात येईल असेही यावेळी मंत्री सावे यांनी माहिती दिली आहेत.

या बरोबरच मुख्य अधिकारी वंदना सूर्यवंशी, डेप्युटी सी ई ओ अनिल वानखडे, MHADA’s Homes Price Reduce by 20 Percent मुख्य वास्तुशास्त्रज्ञ व प्लानर  पी. डी. साळुंखे, सहमुख्य अधिकारी उमेश वाघ, कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी अनिल अंकलगी, Legal Adviser मृदुला परब, उपमुख्य अधिकारी (Marketing) राजेंद्र गायकवाड, गृहनिर्माण विभागाचे उपसचिव अजित कवडे, चीफ इन्फर्मेशन व संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके व इतर अधिकाऱ्यांची उपस्थीती होती.

म्हाडाच्या घरांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आपल्याला पहायला मिळत आहे. परिणामी अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. मुंबई मंडळातील घरांचे दर स्वस्त केल्याने आता सर्व अर्जदार आनंदित झाले आहेत. दिनांक 19 सप्टेंबर पर्यंत लवकरात लवकर म्हाडाच्या वेबसाईट वर अर्ज करण्याबाबत राज्य शासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> https://sarkaribatmya.in/maharashtra-police-hierarchy-constable-to-ips/

फॉलो करा फेसबुक पेज >>>  https://www.facebook.com/profile.php?id=61556645477169

Leave a Comment