पोलीस शिपाई ते पोलीस महासंचालक, अशी आहे महाराष्ट्र पोलिसांची पदरचना Maharashtra Police hierarchy Constable to IPS

तुम्ही असे होऊ शकता पीएसआय, डीवायएसपी, आयपीएस

महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेली पोलीस यंत्रणा  Maharashtra Police hierarchy Constable to IPS हि अत्यंत उत्कृष्ट पोलीस यंत्रणा म्हणून लौकिक आहे. कोरोना सारख्या अदृश्य राक्षसापासून आपल्याला वाचवण्यासाठी पोलिसांनी स्वत:च्या जिवाजी ढाल केलेली आपण पहिली आहे. 26/11 च्या मुंबई दहशदवादी हल्ला असो की आपल्या गल्लीतला गणपती उत्सव दिवस रात्र आपली सुरक्षा करण्यासाठी छातीचा कोट करून उभा राहतात ते आपल्या सर्वांचे आदरणीय पोलीस खाते. या अत्यंत महत्वाच्या पोलीस खात्याविषयी Head Constable ते DGP संपूर्ण पोलीस रचना आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

संक्षिप्त बातमी Maharashtra Police hierarchy Constable to IPS

पोलीस विभागातील सविस्तर पदरचना खालील प्रमाणे.

  1. पोलीस शिपाई -Police
  2. पोलीस नाईक – Police Naik
  3. पोलीस हवालदार – Police Head Constable
  4. सहायक पोलीस उप निरीक्षक (सहायक फौजदार) – Assistant Sub Inspector
  5. पोलीस उप निरीक्षक ( फौजदार ) Police Sub Inspector
  6. सहयक पोलीस निरीक्षक Assistant Police Inspector
  7. पोलीस निरीक्षक – Police Inspector
  8. सहायक पोलीस आयुक्त/ पोलीस उप अधीक्षक- Assistant Police Commissioner/ Deputy Police Superintendent
  9. पोलीस उपायुक्त/ अप्पर पोलीस अधिक्षक -Deputy  Commissioner of Police/ Additional Superintendent Police
  10.  पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षक – Police Commissioner/ Police Superintendent
  11. पोलीस उप महानिरीक्षक – Deputy Inspector General of Police
  12. पोलीस महानिरीक्षक – Inspector General of Police
  13. अतिरिक्त पोलीस महासंचालक – Additional Director General Of police
  14. पोलीस महासंचालक – Director General of Police
सरकारी बातम्या आणि निवडणुकीविषयीचे UPDATE मिळवण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा.

पोलीस शिपाई -Police

पोलीस शिपाई यांची निवड महाराष्ट्र शासनाने सरळ सेवा भरती प्रक्रियेतून केलेली असते. यांच्या खाकी वर्दीवर कसल्याही प्रकारची फीत नसते. Maharashtra Police hierarchy Constable to IPS पदोन्नतीने ते पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहाय्यक पोलीस उप निरीक्षक या पदापर्यंत पोहोचू सेवा जेष्ठतेनुसार पोहोचू शकतात.

पोलीस नाईक – Police Naik

पोलीस शिपाई यांची पहिली पदोन्नती पोलीस नाईक या पदावर केली जाते. पोलीस नाईक यांची खांद्यावर दोन पिवळ्या फिती असतात. सेवा जेष्ठता पदोन्नतीने ते त्यांच्या निवृतीपर्यंत सहाय्यक पोलीस उप निरीक्षक या पदापर्यंत पोहोचू शकतात.

पोलीस हवालदार – Police Head Constable

पोलीस नाईक या पदानंतर पोलीस हवलदार या पदावर पदोन्नती होते. खांद्यावर तीन पिवळ्या फिती असलेले हे हवालदार सेवा जेष्ठता पदोन्नतीने  त्यांच्या निवृतीपर्यंत सहाय्यक पोलीस उप निरीक्षक या पदापर्यंत पोहोचू शकतात. Maharashtra Police hierarchy Constable to IPS विशेष म्हणजे हवालदार म्हणून कामकाजाचा अनुभव घेतल्या नंतर खात्यांतर्गत परीक्षा देऊन त्यांना पोलीस उप निरीक्षक (psi) होता येते.

सहाय्यक पोलीस उप निरीक्षक (सहायक फौजदार) – Assistant Sub Inspector

पोलीस हवालदार नंतर सेवा जेष्ठतेनुसार सहाय्यक पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नत होतात. त्यांच्या खांद्यावर एक स्टार (1 star), निळी, लाल फीत असते. अलीकडेच आलेल्या नवीन शासन निर्णया नुसारसेवेची तीस वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना ग्रेड पोलीस उप निरीक्षक अर्थात Grad Psi म्हणून निवृत्तीपूर्वी पदोन्नती मिळते.

पोलीस उप निरीक्षक ( फौजदार ) Police Sub Inspector

आपल्या सर्वांच्या तोडांत एक शब्द कायम असतो तो म्हणजे PSI. या पोलीस उप निरीक्षकांची निवड हि महाराष्ट्र लोकसेवा अयोगाच्या वतिने केली जाते. पदोन्नतीने ते सहाय्यक पोलीस निरीक्षक (API),पोलीस निरीक्षक (PI), पोलीस उप अधीक्षक (dysp), सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) म्हणून सेवा जेष्ठतेनुसार पदोन्नत होऊ शकतात. पोलीस उप निरीक्षकांच्या खांद्यावर दोन स्टार आणि निळी, लाल फीत असते.(2 Star)

सहयक पोलीस निरीक्षक Assistant Police Inspector

पोलीस उप निरीक्षका नंतर सहायक पोलीस निरीक्षक पदाची पदोन्नती सेवा जेष्ठतेनुसार मिळते. त्यांच्या खांद्यावर तीन स्टार तर एक लाल फीत असते. तसेच मपोसे नावाचा batch यांच्या खांद्यावर आसतो.

पोलीस निरीक्षक – Police Inspector

पोलीस निरीक्षक हे पद खात्यातील अत्यंत महत्वाचे पद मानले जाते. अनेक ठाण्यांचे प्रमुख पद तसेच गुन्ह्यांचा तपास या पोलीस निरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांकडे असतो. Maharashtra Police hierarchy Constable to IPS खांद्यावर तीन स्टार तसेच निळी लाल फीत आणि मपोसे नावाचा batch यांच्या खांद्यावर असतो. खात्यांतर्गत सेवा जेष्ठतेनुसार यांची पदोन्नती सहायक पोलीस आयुक्त किंवा पोलीस उपाधीक्षक पदावर केली होते.

सहायक पोलीस आयुक्त/ पोलीस उप अधीक्षक-Assistant Police Commissioner/ Deputy Police Superintendent

सहायक पोलीस आयुक्त किंवा पोलीस उप अधीक्षक यांची निवड दोन पाद्धीने होते. एक म्हणजे पोलीस निरीक्षक यांना पदोन्नतीने सहायक पोलीस आयुक्त किंवा पोलीस उपाधीक्षक पदी पदोन्नती दिली जाते, परंतु या पोलीस निरीक्षकांना त्यांच्या सेवेच्या शेवटच्या टप्प्यात हे पद मिळते. Maharashtra Police hierarchy Constable to IPS तर दुसरी पद्धत म्हणजे थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्यसेवा परीक्षा जे उमेदवार पास होतात त्यांना थेट या सहायक पोलीस आयुक्त किंवा पोलीस उपाधीक्षक  (ACP, DYSP) पदावर नियुक्ती केली जाते. यांच्या खांद्यावर तीन स्टार आणि मपोसे असा Batch असतो.

पोलीस उपायुक्त/ अप्पर पोलीस अधिक्षक -Deputy  Commissioner of Police/ Additional Superintendent Police

सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस उपाधीक्षक यांना पदोन्नतीने पोलीस उपायुक्त DCP, अप्पर पोलीस अधिक्षक (ADysp) अशा पदांवर सेवा जेष्ठतेने पदोन्नती दिली जाते. Maharashtra Police hierarchy Constable to IPS

पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षक – Police Commissioner/ Police Superintendent

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्य माध्यमातून भारतीय पोलीस सेवा अर्थात INDIAN POLICE SERVICE पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांची नियुक्ती केली जाते. यांच्या खांद्यावर राजमुद्रा आणि IPSअसा batch असतो. हे अधिकारी पूर्ण जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी यांच्यावर असते. Maharashtra Police hierarchy Constable to IPS शहराच्या ठिकाणी पोलीस आयुक्त तर ग्रामीण भागात पोलीस अधीक्षक अशी पोस्ट असते. तसेच गृह खात्यांतर्गत पोलीस विभागाच्या विविध विभागांची जबाबदरी Police Commissioner/ Police Superintendent यांच्यावर असते.

पोलीस उप महानिरीक्षक – Deputy Inspector General of Police

पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षकांना सेवा जेष्ठतेनुसार पोलीस उप महानिरीक्षक – Deputy Inspector General of Police पदावर पदोन्नती मिळते. त्यांच्याकडे माहात्वाच्या विभागांचा तसेच परीक्षेत्राचा कारभार असतो.

पोलीस महासंचालक – Director General of Police

थेट IPS झालेले अधिकारी हे सेवा जेष्ठतेनुसार पोलीस महासंचालक होतात. यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखण्याची तसेच पोलीस विभागाचे नियोजन व प्रतिनिधित्व करण्याची जाबाबदारी असते. Maharashtra Police hierarchy Constable to IPS. भारतीय न्याय संहिता (Bharatiy Nyaya Sanhita), भारतीय सुरक्षा संहिता (Bharatiya Suraksha Sanhita ) या कायद्यांचा अवलंब करून ते कायदा सुव्यवस्था सांभाळतात.

हेही वाचा >>> https://sarkaribatmya.in/empowered-c-a-developed-india/

फॉलो करा फेसबुक पेज >>>  https://www.facebook.com/profile.php?id=61556645477169

Leave a Comment