भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी; प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध Important Update Maharashtra Assembly Election 2024

२० ऑगस्ट पर्यंत करता येणार नवीन मतदार नोंदणी

Maharashtra Assembly Election 2024

Maharashtra Assembly Election 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले आहेत. साधारण सप्टेंबर महिन्यात निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागण्याची शक्य आहे. अशातच भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राज्यातील मतदार याद्या हा सार्वत्रिक निवडणुकीतील महत्वाचा घटक आहे. यासाठी निवडणूक आयोगाच्या Election Commission वतीने मतदार याद्या अद्यायावत करण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता.

मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ  
अ.क्र.      बाबलोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024एकीकृत प्रारुप मतदार यादीतील
1मतदार यादीतील एकुण मतदार संख्या9,29,43,8909,36,75,934
2राज्यातील एकुण मतदान केंद्रांची संख्या98,1401,00,186
3उतुंग इमारती व समूह सहकारी गृह निर्माण सोसायटींमधील मतदान केंद्रांची संख्या1501,165

अद्ययावत यादीत तुमचं नाव आहे का? तपासून पहा Voter list

दि. ०६ ऑगस्ट २०२४ रोजी एकीकृत प्रारूप मतदार यादी voter list प्रकाशित झालेली आहे. यामध्ये सर्व मतदारांची अद्ययावत माहिती समाविष्ट आहे. ही मतदार यादी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर यादी भागासहीत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

Voter Helpline हे मोबाइल अॅपचा वापर करा Maharashtra Assembly Election 2024

ही यादी डाऊनलोड करून तसेच www.voters.eci.gov.in  या संकेतस्थळावरून अथवा Voter Helpline हे मोबाइल अॅपचा वापर करून मतदारांना मतदार यादीत त्यांचे नाव आहे की नाही, तसेच नाव असेल तर त्यासोबतच वैयक्तिक माहिती आणि पत्ता हे तपशील तपासून पाहता येईल.  ही यादी पाहण्यासाठी मतदार आपल्या जवळच्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाला देखील भेट देऊ शकतील.

हे उपक्रम राबवत मतदार याद्या केल्या अद्ययावत

Maharashtra Assembly Election 2024 या कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करणे, मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करणे, मतदार यादी/ मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे,  आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे तसेच, अस्पष्ट/ अंधुक छायाचित्र बदलुन त्याऐवजी संबंधित मतदाराकडून योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे.

मतदान केंद्राच्या सीमांची पुनर्रचना voter list

विभाग / भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्राच्या सीमांचे पुनर्रचना तयार करून मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे आणि तुलनात्मक फरक शोधून फरक दुर करण्यासाठी कालबध्द योजना आखणे, कंट्रोल टेबल अद्यावत करणे, नमुना १-८ तयार करणे, दि. ०१ जुलै, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत पुरवणी व एकीकृत प्रारूप यादी तयार करणे. इत्यादी पुनरिक्षण – पूर्व उपक्रम आत्तापर्यंत राज्यात राबवण्यात आलेले आहे.

प्रारुप मतदार यादी दि.06 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिध्द 

 राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाची एकिकृत प्रारुप मतदार यादी दि.06 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या प्रारुप यादीमध्ये यापूर्वी झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील Maharashtra Assembly Election 2024 राज्यातील एकूण मतदारांची संख्या, एकूण मतदान केंद्रे, उतुंग इमारती व समूह सहकारी गृह निर्माण सोसायटींमधील मतदान केंद्रांची संख्या यांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे.

दावे आणि हरकती स्वीकारण्याचा कालावधी :

दि.०६ ऑगस्ट २०२४ (मंगळवार) ते २० ऑगस्ट २०२४ (मंगळवार) ह्या कालावधीत नागरिकांना नविन मतदार नोंदणी करणे, मतदारांची नावे, पत्ते, आणि अन्य तपशील दुरुस्त्या व बदल, तसेच मतदार यादीतील नोंदींना आक्षेप करण्यासाठी खालील प्रकारचे अर्ज भरता येतील. यासोबतच, मृत्यू /कायमचे स्थलांतर या आणि अशा योग्य कारणांसाठी मतदार यादीतून नाव वगळण्याचा अर्जही भरता येईल.

अर्ज क्रमांक ६ – नव मतदार नोंदणीसाठी voter Enrolment. 

अर्ज क्रमांक ८ – मतदार यादीतील वैयक्तिक तपशीलात बदल/दुरुस्त्या- अद्ययावतीकरण, पत्त्यातील बदल/स्थलांतर, दिव्यांगत्वाचे चिन्हांकन, मोबाईल क्रमांक/ईमेल आयडी हे तपशील जोडणे, मतदार ओळखपत्र पुन्हा मिळावे यासाठी विनंती करणे.

अर्ज क्रमांक ७ – योग्य कारणासाठी मतदार यादीतून नाव वगळण्याच्या विनंतीसाठी.

Maharashtra Assembly Election 2024

अर्ज क्रमांक ६ब – मतदार ओळखपत्रासोबत आधार क्रमांक जोडण्यासाठी.

हे सर्व अर्ज www.voters.eci.gov.in हे संकेतस्थळ किंवा Voter Helpline हे मोबाइल अॅप वापरून ऑनलाईन भरता येतील. यासोबतच जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयाला भेट देऊन, तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमादरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या विशेष शिबिरांमध्ये ऑफलाईन पद्धतीनेही भरता येतील.

प्रत्येक अर्जासोबत गरजेनुसार आपले छायाचित्र, पत्ता तसेच वयाच्या पराव्याचा दस्तऐवज, वा पुरावा म्हणून आवश्यक असलेल्या इतर दस्तऐवजाची स्व-स्वाक्षरीकृत प्रत जोडणे अनिवार्य असणार आहे.

विशेष शिबिरे :

या कार्यक्रमाच्या काळात दि.10, 11 ऑगस्ट व दि.17, 18 ऑगस्ट, 2024 या तारखांना शनिवार आणि रविवार या दिवशी राज्यातील सर्व Maharashtra Assembly Election 2024 मतदान केंद्रांवर मतदार नोंदणिकरीता विशेष शिबिरे आयोजित केली जातील.

दावे आणि हरकती निकालात काढण्याचा कालावधी :

कार्यक्रमाच्या कालावधीत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सर्व अर्जांवर अर्थात दावे आणि हरकतींवर नियमांनुसार कार्यवाही करून ते दि. २९ ऑगस्ट २०२४ (गुरूवार) पर्यंत निकाली काढले जातील.

अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी :

दावे आणि हरकती नियमांनुसार निकाली काढल्यानंतर दि. ३० ऑगस्ट २०२४ (शुक्रवार) रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाईल. Maharashtra Assembly Election 2024 यात या कार्यक्रमादरम्यान दावे आणि हरकतीसाठी उपलब्ध करून दिलेल्या कालावधीत आलेल्या अर्जांवरील कार्यवाहीनुसार नव्या तसेच बदल आणि दुरुस्ती केलेल्या मतदारांच्या नावासहीतची अंतिम यादी समाविष्ट असेल.

मतदार नोंदणीसाठी महत्वाचे :

दि. १ ऑक्टोबर २०२४ किंवा त्याआधी १८ वर्षे पूर्ण केलेले भारतीय नागरिक मतदार नोंदणीसाठी पात्र असतील.

मतदार यादीत नाव तपासण्यासाठी :

मतदार यादीत आपले नाव तपासण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत:

  • मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय.

मदत क्रमांक :– voter list

नागरिकांना कोणतीही अडचण असल्यास मतदार मदत (Helpline) क्रमांक १९५० किंवा १८००२२१९५० वर संपर्क साधावा.

हेही वाचा >>> https://sarkaribatmya.in/excellent-public-ganesh-festival-award/

Leave a Comment