शासन राबवणार बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहिम Maazhi Ladki Bahin Yojana 2024
– महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे
महाराष्ट्र शासनाची अतिशय महत्वाकांक्षी योजना Maazhi Ladki Bahin Yojana 2024 असलेली आणि सध्या सर्वत्र चर्चेत असेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ आता १७ ऑगस्ट पासून वितरीत केले जाणार आहे. या योजनेची रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात थेट वर्ग केली जाणार आहे. यासंदार्भात लाभार्थ्यांनी त्यांच्या आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी जोडणे आवश्यक आहे. तर त्यांना लाभ मिळणे सुलभ होईल. शासनाने देखील आधार जोडणीसाठीची मोहीम शिबिरांच्या माध्यमातून हाती घ्यावी असे आवाहन अदिती तटकरे यांनी केले आहे.
संक्षिप्त बातमी
– मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण: 17 ऑगस्ट रोजी होणार आहे.
– अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांसाठी आधार जोडणी: 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्या महिलांना आधार जोडलेल्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे.
– आधार जोडणी न केलेल्या लाभार्थ्यांसाठी विशेष शिबिरे: जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येईल.
– महिला व बालविकास मंत्र्यांचे निर्देश: कु. अदिती तटकरे यांनी योजनेच्या लाभ वितरणाचे आढावा घेतला आणि मार्गदर्शन केले.
– राज्यस्तरीय लाभ वितरण कार्यक्रम: 17 ऑगस्ट रोजी पुण्यात होईल, प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री किंवा खासदार/आमदार यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय कार्यक्रम घेतला जाईल.
– लाभार्थींची यादी: आतापर्यंत 1 कोटी 35 लाख लाभार्थ्यांची यादी तयार झाली आहे.
– आधार जोडणीची विशेष मोहिम: सुमारे 27 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेले नाहीत. जिल्ह्यात विशेष मोहिम राबवावी.
– लाभ प्राप्त करण्याची प्रक्रिया: 17 ऑगस्ट रोजी आधार जोडलेल्या लाभार्थ्यांना दोन हप्त्यांमध्ये लाभ मिळेल, आणि आधार जोडलेले नसल्यानं लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांना आधार जोडल्यानंतर लाभ मिळेल.
– अर्जाची प्रक्रिया: 31 ऑगस्टनंतरही अर्जाची प्रक्रिया सुरू राहील, नवीन अर्जदारांना लाभ मिळवता येईल.
– नवीन ॲप्लिकेशन: अर्जाच्या छाननीसाठी नवीन ॲप्लिकेशन तयार केले आहे, स्थानिकस्तरावर अधिकार दिले आहेत आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.
– आकडेवारीची उपलब्धता: नवीन ॲप्लिकेशनमध्ये वॉर्डस्तरीय आणि विधानसभा निहाय आकडेवारी उपलब्ध होईल.

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या Maazhi Ladki Bahin Yojana 2024 लाभाचे वितरण येत्या 17 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. दि.31 जुलै पर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे. ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही, अशा लाभार्थ्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजन करावे. आधार जोडणी झाल्यावर या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचा लाभ मिळणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री Aditi Tatkare कु. अदिती तटकरे यांनी आज येथे सांगितले.
जिल्ह्यात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात यावेत
कु.तटकरे Aditi Tatkare म्हणाल्या की, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची आहे. Maazhi Ladki Bahin Yojana 2024 या योजनेच्या लाभ वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या 17 ऑगस्ट रोजी पुण्यात होणार आहे. त्याचवेळी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात यावेत. जेथे पालकमंत्री उपलब्ध नसतील त्या जिल्ह्यात खासदार/आमदार यांच्या उपस्थितीत त्याचवेळी लाभ वितरणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम घेण्यात यावा. त्या ठिकाणी राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात यावे.
लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहिम
या योजनेत आतापर्यंत 1 कोटी 35 लाख लाभार्थ्यांची यादी तयार झाली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डिबिटीद्वारे लाभ जमा करण्यात येणार आहेत. Maazhi Ladki Bahin Yojana 2024 पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 27 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत. या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहिम प्रत्येक जिल्ह्यात राबवावी. कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. त्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्सची मदत घेण्यात यावी. येत्या 17 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत, अशा सूचना Aditi Tatkare कु. तटकरे यांनी दिल्या.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी दि. ३१ ऑगस्ट़ पर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. दि. ३१ ऑगस्ट़ नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यानाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. असेही Aditi Tatkare कु. तटकरे यांनी सांगितले.
बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या 17 ऑगस्ट रोजी लाभाचे दोन हप्ते मिळणार आहेत. परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाही, अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे. कोणतीही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाहीत. 17 ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपले बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावेत, असे आवाहनही Aditi Tatkare कु. तटकरे यांनी यावेळी केले.
हेही वाचा >>> https://sarkaribatmya.in/savitribai-phule-pune-university-top-rank-india/
फॉलो करा फेसबुक पेज >>> https://www.facebook.com/profile.php?id=61556645477169