उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षा फेब्रुवारी – मार्च २०२५ HSC Online Hall Ticket 2025 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
10 जानेवारी पासून प्रवेश पत्र उपलब्ध HSC Online Hall Ticket 2025
सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना ही प्रवेश पत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शुक्रवार दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी ‘ऍडमिट कार्ड’ या लिंक द्वारे डाऊनलोड करण्याकरिता उपलब्ध होतील, असे राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी कळविले आहे.
संक्षिप्त बातमी
- १२ वी उच्च माध्यमिक परीक्षा २०२५ साठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आली आहेत.
- सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थी www.mahahsscboard.in संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात.
- प्रवेशपत्र १० जानेवारी २०२५ पासून ‘ऍडमिट कार्ड’ लिंकद्वारे उपलब्ध आहेत.
- संबंधित शाळा, महाविद्यालयांना या प्रवेशपत्रांचा डाउनलोड करण्यासाठी सूचित करण्यात आले आहे.
- तांत्रिक अडचणींवर लक्ष देण्यासाठी शाळा / महाविद्यालयांनी विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.
https://sarkaribatmya.in/journalist-awards-2024/
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक / प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना याबाबत सूचित करण्यात आले आहे. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत करण्यात आले आहे.