आरोग्याच्या दृष्टिकोनातून दूध हे शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. मात्र अलीकडे बरेचदा दुधामध्ये भेसळ आढळून येते. यावर प्रतिबंध लावण्यासाठी हेल्पलाईन Helpline For Adulteration of Food सुरु केली आहे. दुध हे आपल्या जीवन शैलीत महत्वाचे असून मोठ्या प्रमाणावर दुधाचा वापर लहान बालकांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत पिण्यासाठी केला जातो. मात्र राज्यात काही ठिकाणी दुधात भेसळीचे प्रकार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. भेसळयुक्त अन्नावर प्रतिबंध लावण्यासाठी राज्य सरकारने नवीन Helpline For Adulteration of Food हेल्पलाईन सुरु केली आहे.
त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने आज एकाच दिवशी दूध भेसळ तपासणी मोहीम राबविण्यात येऊन 1 हजार 62 दुधाचे सर्वेक्षण नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेतले. या तपासणी नमुन्यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत अशी माहिती, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.
https://sarkaribatmya.in/powerful-submarines-ins-surat-nilgiri-vagsheer/
संक्षिप्त बातमी
- दूध आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असून, लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील लोक दूध पितात. मात्र, राज्यात काही ठिकाणी दूध भेसळ होण्याच्या घटना समोर येत आहेत.
- अन्न आणि औषध प्रशासनाने दूध भेसळ तपासणी मोहीम राबवून 1062 दूधाचे सर्वेक्षण नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत. दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल.
- अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 आणि नियम 2011 अंतर्गत अन्न व औषध प्रशासन विभाग नागरिकांना सुरक्षित व निर्भेळ अन्न प्रदान करण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे.
- 15जानेवारी रोजी राज्यभरात व्यापक दूध सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली, ज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री उपस्थित होते.
- 103 अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी राज्यभरातून दूधाचे सर्वेक्षण नमुने गोळा केले. त्यापैकी 380 पॅक्ड आणि 382 सुटे दूध नमुने ताब्यात घेतले आहेत.
- दूध किंवा अन्नपदार्थांमध्ये भेसळ दिसल्यास नागरिकांनी त्वरित Helpline For Adulteration of Food 1800222365 हेल्पलाइन, jc-foodhq@gov.in ईमेल किंवा https://foscos.fssai.gov.in/consumergrievance पोर्टलवर तक्रार नोंदवावी.
सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न
अन्न व औषध प्रशासन विभाग अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 नियम व नियमन 2011 ची अंमलबजावणी करुन राज्यातील नागरिकांना सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करुन त्यांचे जीवनमान उंचावण्याबाबत विविध उपाययोजना करीत असल्याचे मंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले.
दूध या अन्नपदार्थाची सर्वेक्षण मोहीम
दूध/दुग्धजन्य अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांवर जरब बसण्याकरिता व भेसळ रोखण्याकरिता तसेच राज्यातील जनतेस उपलब्ध होणाऱ्या दूध व दुग्धजन्य अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासण्याच्या अनुषंगाने आज 15 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार , अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनामार्फत संपूर्ण राज्यात व्यापक स्वरूपात दूध या अन्नपदार्थाची सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली.
सर्वेक्षणातील नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत
या मोहिमेअंतर्गत एकाचवेळी राज्यभरातील विविध ठिकाणांहून दूधाचे सर्वेक्षण नमुने घेऊन त्यांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी 103 अन्न सुरक्षा अधिकारी यांना सर्वेक्षण नमुने घेण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. Helpline For Adulteration of Food त्यानुसार आज सकाळी 5 वाजेपासून राज्यभरातील अन्न सुरक्षा अधिकारी यांनी दूध उत्पादक, वितरक, विक्रेते व रस्त्यावरील विक्री केंद्रांवरून 1हजार 62 दुधाचे सर्वेक्षण नमुने विश्लेषणासाठी घेतले.
त्यापैकी राज्यात विक्री होणाऱ्या विविध ब्रान्डच्या दुधाचे 680 पाउच / पिशवी पॅकिंग मधून व 380 सुट्या स्वरूपातील दुधाचे आहेत. ताब्यात घेण्यात आलेले नमुने अन्न सुरक्षा व मानके प्राधिकृत अन्न प्रयोगशाळेत पाठवून भेसळ, रसायनांचे प्रमाण व दूधाच्या गुणवत्तेची तपासणी केली जाणार आहे.
उत्पादक व पुरवठादार यांचेवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई
या सर्वेक्षण नमुने विश्लेषणांती दुधाच्या नमुन्यामध्ये भेसळ आढळल्यास तात्काळ या आस्थापनेमधून कायदेशीर नमुने घेऊन संबंधित उत्पादक व पुरवठादार यांचेवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले की, “दूधातील भेसळ ही गंभीर समस्या आहे. नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी दूध भेसळ हा विषय गांभीर्याने घेतला आहे. Helpline For Adulteration of Food भेसळ करणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने आज राज्यभरामध्ये दूधाचे सर्वेक्षण नमुने घेण्याची मोहीम राबविण्यात आली आहे.
भेसळ आढळल्यास तत्काळ संपर्क करा Helpline For Adulteration of Food
अन्न भेसळ रोखण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा वारंवार घेण्यात येणार आहेत. नागरिकांनी दूध किंवा अन्नपदार्थांमध्ये भेसळ दिसल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या Helpline For Adulteration of Food हेल्पलाइन क्रमांक [1800222365] वर त्वरित संपर्क साधावा किंवा jc-foodhq@gov.in या ईमेल वर किंवा https://foscos.fssai.gov.in/