मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्त तांत्रिक समिती नियुक्त केली
काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट येथील पुतळा कोसळण्याची घटना घडली होती. experts committee for grand statue of Shivaji Maharaj अधिकच्या पावसाने आणि वाऱ्याने हा पुतळा कोसळल्याची सर्वत्र चर्चा होती. या घटनेची गंभीर दखल महाराष्ट्र शासनाने आणि केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधण्यासाठी किंबहुना सदर दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी तज्ञ समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थापत्य अभियंते , तज्ज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा या तांत्रिक संयुक्त समितीत समावेश असेल.
संक्षिप्त बातमी experts committee for grand statue of Shivaji Maharaj
– घटना: राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कोसळण्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी एक संयुक्त तांत्रिक समिती नियुक्त करण्यात आली आहे.
– प्रसिद्धीपत्रक: केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने या समितीच्या नियुक्तीची घोषणा प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
– अध्यक्ष: या समितीचे अध्यक्ष भारतीय नौदल असतील.experts committee for grand statue of Shivaji Maharaj
– सदस्य: समितीत महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी आणि तांत्रिक तज्ज्ञांचा समावेश असेल.
– उद्दिष्ट: पुतळ्याच्या कोसळण्याचे कारण समजून घेणे आणि त्याच्या पुनर्स्थापनेसाठी आवश्यक उपाययोजना करणे हे या चौकशीचे उद्दिष्ट आहे
.
– पार्श्वभूमी: पुतळ्याचे अनावरण 4 डिसेंबर 2023 रोजी सिंधुदुर्गात प्रथमच आयोजित नौदल दिनाच्या समारंभात करण्यात आले होते, ज्यामध्ये मराठा नौदल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सागरी संरक्षण आणि सुरक्षेच्या वारशाचा गौरव करण्यात आला.
– पत्रकातील तपशील: या प्रकल्पाची संकल्पना भारतीय नौदलाने तयार केली होती आणि राज्य सरकारने यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. भारतीय नौदल पुतळ्याच्या पुनर्स्थापनेसाठी देण्यास कटीबद्ध आहे असे पत्रकात नमूद केले असून, महाराजांच्या पुतळ्याची अत्युकृष्ठ दर्जाची उभारणी केली जाईल.
छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळाउभारला जाणार experts committee for grand statue of Shivaji Maharaj असल्याची देखील माहिती आहे. यासठी उत्तम शिल्पकार, सिव्हील इंजिनिअर, तज्ज्ञ, नेव्हीचे अधिकारी यांची एक समिती नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने देखील या संदर्भात गंभीर दखल घेतल्याची माहिती पत्रकाद्वारे दिली. या घटनेची चौकशी करण्यासाठी भारतीय नौदलाच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी, तांत्रिक तज्ज्ञ यांचा समावेश असलेली एक संयुक्त तांत्रिक समिती नियुक्त करणार असल्याचे म्हटले आहे. experts committee for grand statue of Shivaji Maharaj परिणामी भारतीय नौदल आणि महाराष्ट्र शासन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने या पुढील कार्यवाही तज्ञ समितीच्या मार्फत केली जाईल.
04 डिसेंबर 2023 रोजी पुतळ्याचे अतिशय उत्साहात अनावरण करण्यात आले होते. मराठा नौदल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी सागरी संरक्षण आणि सुरक्षेच्या ऐतिहासिक वारशाचं प्रतिक म्हणून हा पुतळा उभारण्यात आला होता. experts committee for grand statue of Shivaji Maharaj अत्याधुनिक इंडियन नेव्ही समवेत ऐतिहासिक दुवा अधोरेखित करण्यासाठी सिंधुदुर्गात राजकोट येथे या अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रकल्पाची अद्वितीय संकल्पना भारतीय नौदलाच्या वतीने तयार करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य सरकारच्या समन्वयाने त्यासाठी निधीचीतरतूद करून देण्यात आली होती. छत्रपती शिवरायांचा पुतळा लवकरात लवकर पुनर्स्थापित करण्यासाठी सर्व उपायांमध्ये मदत करण्यासाठी भारतीय नौदल कटीबद्ध असल्याची भूमिका इंडियन नेव्हीची आहे असे या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
छत्रपतींच्या पुतळ्याला नव्याने भव्य स्वरुपात तयार करण्या बरोबरच उत्कृष्ठरित्याउभारणी साठी JJ स्कूल ऑफ आर्टस, IIT, स्थापत्य अभियंते, यांच्यासह महाराष्ट्र राज्यातील नामांकित शिल्पकार, तसेच नेव्हीचे तांत्रिक अधिकारी यांची तज्ञ समिती देखील गाठीत करण्यासंदर्भात समिती गठीत करण्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली होती.
उभारण्यात येणाराछत्रपती शिवरायांचा पुतळा त्यांच्या लौकिकाला साजेसा असायला हवा यासाठी पुरेपूर प्रयत्न केला जाईल. या साठी राज्य शासन कसल्याही प्राकारची निधीची कमतरता भासू देणार नाही.भविष्यात अशी दुर्घटना घडू नये किंबहुना अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अतिशय काळजी घेण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.झालेल्या दुर्दैवी घटने मुळे शिव भक्तांच्या भावना तीव्र आहेत. नौदल दिन साजरा करण्याच्या निमित्ताने अतिशय चांगल्या भावनेतून इंडियन नेव्ही अर्थात नौदलाने हा पुतळा उभारला होता.
या घटनेसंदर्भात CM एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी येथे विविध खात्यांच्या आणि नेव्हीच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. बैठकीला DCM देवेंद्र फडणवीस, Public works minister रवींद्र चव्हाण, School Education Minister दीपक केसरकर, Chief Secretory सुजाता सौनिकexperts committee for grand statue of Shivaji Maharaj , Additional Chief Secretory (home) इक्बाल सिंग चहल, मनिषा म्हैसकर, असीम गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, DGP रश्मी शुक्ला, vice Admiral अजय कोचर, Rear Admiral मनीष चढ्ढा, शिल्पकार राम सुतार, विनय वाघ, शशिकांत वडके यांची उपस्थिती होती.
हेही वाचा >>> https://sarkaribatmya.in/maharashtra-police-hierarchy-constable-to-ips/
फॉलो करा फेसबुक पेज >>> https://www.facebook.com/profile.php?id=61556645477169