वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग व आयुष संचालनालयाच्यावतीने अवयवदान दिवस साजरा DMER AYUSH Great Organ Donation Day Celebrate

मुंबईत अवयवदान जनजागृती प्रभातफेरीचे आयोजन

DMER AYUSH Organ Donation Day Celebrate

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग आणि आयुष संचालनालय यांच्या वतीने भारतीय अवयवदान दिनानिमित्त आज मुंबईत अवयवदान जनजागृती प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी अवयवदान करण्याचे आवाहन केले.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर यांच्या हस्ते अवयवदान जनजागृती प्रभात फेरीचा शुभारंभ
DMER AYUSH Organ Donation Day Celebrate

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर यांच्या हस्ते अवयवदान जनजागृती प्रभात फेरीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष आयुक्त राजीव निवतकर, आयुष संचालनालयाचे संचालक डॉ. रमण घुंगराळेकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.अजय चंदनवाले, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय दंत महाविद्यालय मुंबई, आर. ए. पोदार आयुर्वेदिक महाविद्यालय, मुंबई व मित्तल आयुर्वेदिक महाविद्यालय यांचे अधिष्ठाता आदी उपस्थित होते.

अवयव दान जनजागृती प्रभातफेरी नरिमन पॉईंट ते यशवंतराव चव्हाण सेंटर पर्यंत काढण्यात आली. प्रभातफेरीमध्ये ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई, शासकीय दंत महाविद्यालय मुंबई, आर.ए.पोदार आयुर्वेदिक महाविद्यालय मुंबई व मित्तल आयुर्वेदिक महाविद्यालय यांचे विद्यार्थी, अध्यापक व इतर मान्यवरांचा समावेश होता.

DMER AYUSH Organ Donation Day Celebrate यावेळी यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात विभागाद्वारे अवयवदात्यांचा गौरव करण्यात आला. तसेच जुलै महिन्यात विभागाधिनस्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेच्या  विजेत्यांना प्रमाणपत्र व पारितोषक वितरण करण्यात आले.

अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान असून यामुळे अनेकांना नवीन जीवन मिळते. त्यामुळे या अवयवदान मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष श्री. नार्वेकर यांनी यावेळी केले.

DMER AYUSH Organ Donation Day Celebrate प्रधान सचिव श्री. वाघमारे यांनी राज्यातील व देशातील अवयव दानाची परिस्थिती व त्यावर भविष्यात करावयास लागणाऱ्या धोरणाबाबत विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय शिक्षण व आयुष आयुक्त राजीव निवतकर यांनी केले. राज्यात सुरू असलेल्या जनजागृती कार्यक्रमाचे व विभागाद्वारे अवयवदान सक्षम करण्याकरीता घेण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती त्यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमात कार्यक्रमाचे समन्वय मुख्य प्रशासकीय अधिकारी श्रीमती मृणाल पोतदार व विशेष कार्य अधिकारी डॉ. राकेश वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. डिंपल पाडावे व डॉ. रेवत कानिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे यांनी केले.

अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. प्रत्येकाने अवयव दानाच्या सर्व तांत्रिक आणि कायदेशीर प्रक्रिया समजून घेणे अत्यावश्यक आहे. अवयव दानाच्या बाबतीत जनजागृती राज्यभर होणे अआपेक्षित आहे.परिणामी गरजू रुग्णांपर्यंत अवयव पोहोचू शकतील. अनेक रुग्णांचे यामुळे प्राण वाचू शकतात.

केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग व राज्य शासनाचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आजचा भारतीय अवयवदान दिवस हा मुंबईप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात सर्व शासकीय वैद्यकीय, दंत व आयुष महाविद्यालयातर्फे राज्यभर साजरा करण्यात आला. यामध्ये राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय, दंत व आयुष महाविद्यालयामार्फत अवयवदान निमित्त विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

– भारतीय अवयवदान दिनानिमित्त मुंबईत जनजागृती प्रभातफेरी
– आयोजन: वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग आणि आयुष संचालनालय
– शुभारंभ: विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

– उपस्थित मान्यवर
– वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव: दिनेश वाघमारे
– वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष आयुक्त: राजीव निवतकर
– आयुष संचालनालयाचे संचालक: डॉ. रमण घुंगराळेकर
– वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक: डॉ. अजय चंदनवाले
– ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय दंत महाविद्यालय मुंबई, आर. ए. पोदार आयुर्वेदिक महाविद्यालय, मुंबई व मित्तल आयुर्वेदिक महाविद्यालय यांचे अधिष्ठाता

– प्रभातफेरीची माहिती:
– मार्ग: नरिमन पॉईंट ते यशवंतराव चव्हाण सेंटर
– सहभागी: ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय दंत महाविद्यालय, आर. ए. पोदार आयुर्वेदिक महाविद्यालय, मित्तल आयुर्वेदिक महाविद्यालय यांचे विद्यार्थी, अध्यापक व इतर मान्यवर

– कार्यक्रमातील प्रमुख घटक:
– अवयवदात्यांचा गौरव
– जुलै महिन्यातील विविध स्पर्धेच्या विजेत्यांना प्रमाणपत्र व पारितोषक वितरण
– विधानसभा अध्यक्ष श्री. नार्वेकर यांचे अवयवदान मोहिमेत सहभागाचे आवाहन

– विविध चर्चासत्रे:
– प्रधान सचिव श्री. वाघमारे यांनी अवयवदानाच्या परिस्थिती व भविष्यातील धोरणाबाबत विचार मांडले
– वैद्यकीय शिक्षण व आयुष आयुक्त राजीव निवतकर यांनी जनजागृती कार्यक्रमांची माहिती दिली

– कार्यक्रमाचे समन्वयक:
– मुख्य प्रशासकीय अधिकारी: श्रीमती मृणाल पोतदार
– विशेष कार्य अधिकारी: डॉ. राकेश वाघमारे
– सूत्रसंचालन: डॉ. डिंपल पाडावे व डॉ. रेवत कानिंदे
– आभार प्रदर्शन: सहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे

– अवयवदान दिनाचा राज्यव्यापी उत्सव:
– केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले

हेही वाचा >>> https://sarkaribatmya.in/18-voter-registration-assembly-election/

फॉलो करा फेसबुक पेज >>> https://www.facebook.com/profile.php?id=61556645477169

Leave a Comment