ठाणे, पालघर, नाशिक, रायगड जिल्ह्यातील
महामार्गावरील प्रवाशांना तत्काळ दिलासा
CM Eknath Shinde take Cognizance Highway Problems
नाशिक – भिवंडी रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीसाठी युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना देतानाच रस्ते दुरूस्तीच्या कामात हयगय करू नका. CM Eknath Shinde take Cognizance Highway Problemsपीक अवरमध्ये अवजड वाहतुकीच्या नियमनासाठी कोकण विभागीय आयुक्तांनी एकत्रित अधिसूचना काढावी. अवजड वाहनांसाठी महामार्गालगत पार्किंग लॉट करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी दिले.
संक्षिप्त बातमी CM Eknath shinde
महामार्ग दुरुस्ती व वाहतूक व्यवस्थापन: Government Of Maharashtra
1. खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती:
– ठाणे-नाशिक आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी रॅपिड क्विक हार्डनर आणि एम सिक्टी तंत्रज्ञानाचा वापर सुरू आहे.
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागांना हे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
2. वाहतूक कोंडीची गंभीर दखल:
– नाशिक-भिवंडी रस्त्याची दुरावस्था आणि वाहतूक कोंडीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश दिले आहेत.
– पावसाळ्यात खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामात हयगय करू नये, असे निर्देश दिले आहेत.
3. अवजड वाहतुकीचे नियमन:
– पीक अवर मध्ये अवजड वाहतुकीसाठी कोकण विभागीय आयुक्तांनी एकत्रित अधिसूचना काढावी.
– अवजड वाहनांसाठी महामार्गालगत पार्किंग लॉट तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
4. दुरुस्तीतील अडथळे:
– दुरुस्तीच्या कामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश.
– खड्डे भरण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे सांगितले आहे.
5. ताकदवर काम:
– खड्डे भरण्यात प्रिकास्ट पॅनलचा वापर करावा जिथे वेळ लागतो.
– कामाच्या प्रगतीचा दररोज आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
6. ट्रॅफिक वॉर्डनची संख्या वाढविणे:
– वाहतूक नियमनासाठी ट्रॅफिक वॉर्डनची संख्या वाढविण्याचे निर्देश.
– जेएनपीटीकडून येणाऱ्या अवजड वाहनांचे नियमन करण्यासाठी विशेष उपाययोजना.
7. पार्किंग व नियमन:
– नाशिक महामार्गावर सोनाळे, पडघा, आसनगाव येथे पार्किंग लॉट तयार करण्याचे निर्देश.
– सकाळी आणि संध्याकाळी अवजड वाहतूक बंद करण्याबाबत अधिसूचना जारी करण्याचे आदेश.
खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी रॅपिड क्विक हार्डनर, एम सिक्टी तंत्रज्ञानाचा वापर
ठाणे-नाशिक, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी रॅपिड क्विक हार्डनर, एम सिक्टी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. CM Eknath Shinde take Cognizance Highway Problems हे काम तातडीने पूर्ण करुन नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय महामार्ग, एमएसआरडी, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक Government Of Maharashtra पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
नाशिक- भिवंडी रस्त्याची दूरवस्था झाली आहे. CM Eknath Shinde take Cognizance Highway Problems यामुळे वाहतुकीसाठी अडचणी होत आहेत. पावसाळ्यात रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी, अपघात होत आहेत. याची मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करून ते चांगल्या दर्जाचे आणि जलद गतीने करावे, अशा सूचना दिल्या आहेत.
दुरुस्तीच्या कामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावे
ठाणे ते नाशिक, ठाणे ते अहमदाबाद या महामार्गावरील खड्ड्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. Government Of Maharashtra नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या त्रासातून तात्काळ दिलासा देण्यासाठी यंत्रणांनी दिवसरात्र एक करून खड्डे बुजवावेत. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. खड्डे बुजवताना रॅपिड क्विक सेटींग हार्डनर, एम सिक्टी या साहित्याच्या वापर करावा. तात्काळ खड्डे बुजविल्यास वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, CM Eknath Shinde take Cognizance Highway Problems असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
प्रिकास्ट पॅनलचा वापर
ज्या ठिकाणी खड्डे भरायला कालावधी आवश्यक असतो तेथे प्रिकास्ट पॅनलचा वापर करावा. राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापनाने त्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. यंत्रणांनी समन्वयातून काम करावीत. दुरुस्तीच्या कामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी Government Of Maharashtra यावेळी दिले. महामार्ग दुरूस्ती कामाची उद्या पाहणी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
JNPT मधून अवजड वाहनांचे नियंत्रण
CM Eknath Shinde take Cognizance Highway Problems एकीकडे खड्डे बुजवण्याची कार्यवाही सुरू असताना वाहतूक नियमनासाठी ट्रॅफ्रिक वॉर्डनची संख्या वाढविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. जेएनपीटीकडून येणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडू नये यासाठी या अवजड वाहतुकीचे नियमन करण्यासाठी JNPT मधून अवजड वाहनांचे नियंत्रण करण्यात यावे. त्याच्या समन्वयासाठी जिल्हाधिकारी Government Of Maharashtra ठाणे नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहेत.
JNPT कडून पनवेल, पुणे, ठाणे कडे जाणाऱ्या महामार्गावरील खड्डे देखील तातडीने बुजविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. नवी मुंबई, पनवेल, जेएनपीटी भागातून येणाऱ्या वाहतुकीच्या नियमनासाठी सिडकोने नवी मुंबई पोलिसांना 200 ट्रॅफ्रिक वॉर्डन उपलब्ध करून द्यावेत तसेच अवजड वाहनांसाठी आवश्यक तेवढ्या क्रेन जेएनपीटीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी नाशिक महामार्गावर सोनाळे, पडघा, आसनगाव याठिकाणी पार्किंग लॉट तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. CM Eknath Shinde take Cognizance Highway Problems सकाळी सात ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते रात्री अकरा यावेळेत अवजड वाहतूक बंद करण्याबाबत एकत्रित अधिसूचना कोकण विभागीय आयुक्तांनी काढण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. खड्डे भरणे, नाल्यांची दुरुस्ती करणे आदीसह आवश्यक दुरुस्त्या करण्यात याव्यात, या कामाच्या प्रगतीचा दररोज आढावा घेण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. रस्ते वाहतूक, खड्डे आणि वाहतूक कोंडी या समस्या सोडवण्यासाठी सरकार अधिक कटिबद्ध आहे.
हेही वाचा >>> https://sarkaribatmya.in/maharashtra-assembly-election-2024/
फॉलो करा फेसबुक पेज >>> https://www.facebook.com/profile.php?id=61556645477169