रुग्णांची सुरक्षा आणि संसर्ग नियंत्रणासाठी जे जे रुग्णालयाने आणले अत्याधुनिक तंत्रज्ञान
संसर्गजन्य आजारांची वाढती संख्या लक्षात घेता सूक्ष्म जीवाणूंचा नायनाट करून Antimicrobial Infection Control JJ Hospital या आजारांपासून रुग्णांची सुरक्षा होणे अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्रातल्या जेजे हॉस्पिटल ने अशाच एका अद्ययावत उपकरणाची व्यवस्था केली असून अँटीमायक्रोबायोल आपत्कालीन कक्षाची स्थापना रुग्णालयात केली आहे. संसर्गजन्य जीवाणू आणि विषाणूंचा याद्वारे नायनाट करण्यात येणार आहे. इस्रायलच्या सहाय्याने हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. याविषयी साविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
संक्षिप्त बातमी
– उद्घाटन: जेजे हॉस्पिटल येथे अत्याधुनिक अँटीमायक्रोबायोल आपत्कालीन कक्षाचे उद्घाटन इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार महासंचालक निवासी कर्नल याकोव्ह ब्लिटश्टाइन यांच्या हस्ते करण्यात आले.
– सामर्थ्य: रुग्णांची सुरक्षा आणि संसर्ग नियंत्रणासाठी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वापर केला जाणार असून हे उपकरण अत्यंत प्रभावी उपकरण मानले जात आहे.
– तंत्रज्ञान: इस्त्रायल देशाच्या डीप-टेक कंपनी असलेल्या नॅनोसोनोने हे तंत्रज्ञान विकसित केलेले असून निर्लाटच्या सहकार्याने आणलेले प्रगत प्रतिजैविक ऍक्रेलिक पेंट यात वापरण्यात आले आहेत.
– पेंटची क्षमता: या पेंट ची क्षमता इतकी आहे की ते काही तासांतच 99.99% जीवाणू आणि विषाणू नियंत्रित करते.
– QUACTIV™️: पेंटमध्ये समाविष्ट “QUACTIV™️” तंत्रज्ञान सतत हानिकारक सूक्ष्मजीवांपासून रुग्णांना संरक्षण प्रदान करते.
– सहकार्य: इस्रायल देशाचे महावाणिज्य दूतावास, ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हे भारतात आणले गेलेले तंत्रज्ञान एक महत्वाचा टप्पा मनला जात आहे.
– कर्नल याकोव्ह ब्लिटश्टाइन: भारत आणि इस्रायलमधील आरोग्य सेवेतील सहकार्याचे महत्त्व आणि भारतात सार्वजनिक आरोग्य सुविधा विकसित करण्यात या तंत्रज्ञानाची प्रभावी भूमिका मानली जात आहे अशी भावना कर्नल याकोव्ह ब्लिटश्टाइन यांनी व्यक्त केली.
– कोबी शोशानी: इजराइल आणि भारतामधील आरोग्य क्षेत्रातील सहकार्य महत्त्वाचे आहे; या तंत्रज्ञानाचा व्यापक परिणाम होईल अशी भावना कोबी शोशानी व्यक्त केली.
– डॉ. पल्लवी सापळे: QUACTIV™️ तंत्रज्ञानामुळे जेजे हॉस्पिटलच्या रुग्णांची सुरक्षा सुनिश्चित होईल, संक्रमण रोखण्यासाठी अतिरिक्त संरक्षण मिळेल असे डॉ.पल्लवी सापळे यांनी प्रतिपादित केले.
– ओरी बार चेम: QUACTIV™️ तंत्रज्ञान संक्रमण नियंत्रणात महत्त्वपूर्ण प्रगती आहे; भारतात याचा सकारात्मक प्रभाव पाहून अंगात उत्साह संचारतो असे ओरी बार चेंम यांनी सांगितले.

काही तासांत 99.99% जीवाणू, विषाणूवर नियंत्रण मिळवणे शक्य
हे आधुनिक तंत्रज्ञान इस्त्रायल देशाच्या डीप-टेक कंपनी नॅनोसोनोने निर्लाटच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. Antimicrobial Infection Control JJ Hospital प्रगत प्रतिजैविक ऍक्रेलिक पेंट यांचा सदर तंत्रज्ञानात वापर करण्यात आल्याची माहिती आहे. अतिशय नाविन्यपूर्ण आणि सक्षम असेलेले पेंट काही तासांतच 99.99% जीवाणू, विषाणूचा नयनाट करू शकते.
इस्रायलच्या देशाने आरोग्य सेवा सिस्टीम मध्ये पूर्वीच यश संपादित केलेले आहे. Antimicrobial Infection Control JJ Hospital आधुनिक तंत्रज्ञान मुंबईतील इस्रायलचे महावाणिज्य दूतावास, ग्रँट सरकारी वैद्यकीय रुग्णालय आणि महाराष्ट्र राज्य शासन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून भारतात स्थापित करण्यात आले आहे.
“QUACTIV™️ मुळे निकारक सूक्ष्मजीवांपासून सतत संरक्षण
पेंट जोपर्यंत भिंतींवर राहते तोपर्यंत हानिकारक सूक्ष्मजीवांपासून सतत संरक्षित करण्याची प्रक्रिया सुरु असते. याचे महत्वाचे कारण म्हणजे पेंटमध्ये समाविष्ट केलेले “QUACTIV™️ क्वाएक्टीव्ह तंत्रज्ञानाचा समावेश. या आधुनिकतेमुळे पेंट आणि तंत्रज्ञान संक्रमण नियंत्रणासह पर्यावरणास अनुकूलता आणि सुरक्षितता असल्याचा दावा करण्यात आला आहे.
याकोव्ह ब्लिटश्टाइन यांच्या हस्ते प्रारंभ
जेजे हॉस्पिटल येथे अत्याधुनिक अँटीमायक्रोबायोल आपत्कालीन कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. Antimicrobial Infection Control JJ Hospital रुग्णांची सुरक्षा आणि संसर्ग नियंत्रणासाठी यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली. इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार डायरेक्टर कर्नल याकोव्ह ब्लिटश्टाइन यांच्या हस्ते या सुविधेचा मोठ्या दणक्यात शुभारंभ करण्यात आला.
भारतात रुग्णांची सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्य सुविधा विकसित
.Antimicrobial Infection Control JJ Hospital कर्नल (निवासी) याकोव्ह ब्लिटश्टाइन यानी यावेळी बोलताना मोठा आनंद व्यक्त केला. जेजे रुग्णालयामध्ये या प्रगत आणि प्रतिजैविक आणीबाणी कक्षाचे हे उदघाटन हे महत्वपूर्ण घटक आहे. भारतात रुग्णांची सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्य सुविधा विकसित करण्यामध्ये हे पाऊल निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इस्रायल आणि भारत यांच्यातील आरोग्य सेवेतील सहकार्यातील अद्वीतीय टप्पा आहे.
दोन्ही राष्ट्रांमधील संबंध वृद्धिंगत होणार
इजराइल देश आणि भारत देशात आरोग्य क्षेत्रातील देवाण-घेवाणसाठी हे अद्वितीय सहकार्य महत्त्वपूर्ण आहे असल्याचे प्रतिपादन शोशानी यांनी केले. दोन्ही राष्ट्रांमधील संबंध यामुळे आणखी वृद्धिंगत होणार आहे. Antimicrobial Infection Control JJ Hospital वैद्यकीय सुविधांमध्ये बदल घडवून आणणारी ही झेप असून एक महत्त्वाचा टप्पा आहे. रुग्णांची सुरक्षा आणि संसर्ग नियंत्रण यामध्ये या नव्या तंत्रज्ञानाचा व्यापक परिणाम प्रभावीपणे होईल असे इस्रायलचे मुंबईतील प्रतिनिधी कोबी शोशानी यांनी म्हटले.
सुरक्षित वातावरण राखण्यासाठी तंत्रज्ञान
जेजे हॉस्पिटलच्या डीन डॉ. पल्लवी सापळे यांनीही यावेळी त्यायांचे मत व्यक्त केले. Antimicrobial Infection Control JJ Hospital अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अवलंबामुळे रुग्णांची सुरक्षा होण्यास मोठे सहकार्य लाभेल. “QUACTIV™️ क्वाएक्टीव्ह प्रतिजैविक पेंट म्हणजे जेजे रुग्णालयासाठी एक मैलाचा दगड आहे. संक्रमण रोखण्यासाठी आणि सुरक्षित वातावरण राखण्यासाठी या तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.
हेही वाचा >>> https://sarkaribatmya.in/maharashtra-police-hierarchy-constable-to-ips/
फॉलो करा फेसबुक पेज >>> https://www.facebook.com/profile.php?id=61556645477169