शासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय इत्यादी माहिती लोकांपर्यंत जलदगतीने आणि प्रभावीरीत्या पोहोचविण्यासाठी AI Technology Use for Public Relation शासनाचे डिजीटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्यात येईल. यासाठी यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) AI तंत्राचा वापर करण्यात येईल. विविध नवमाध्यमांचा प्रभावी वापर करून शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
संक्षिप्त बातमी
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढणार: शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवला जाणार आहे. यामुळे माहिती अधिक प्रभावीपणे आणि वेगाने जनतेपर्यंत पोहोचेल.
डिजिटल माध्यम धोरण: शासन लवकरच एक डिजिटल माध्यम AI Technology Use for Public Relation धोरण तयार करणार आहे. या धोरणामुळे शासकीय योजनांची माहिती विविध डिजिटल माध्यमांमधून जनतेपर्यंत पोहोचवणे सोपे होईल.
राज्यस्तरीय संदर्भ कक्ष: शासकीय योजनांची सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यस्तरावर एक संदर्भ कक्ष स्थापन केला जाईल. यामुळे नागरिकांना आवश्यक माहिती सहज मिळेल.
नवमाध्यमांचा प्रभावी वापर: शासन विविध नवमाध्यमांचा AI Technology Use for Public Relation प्रभावीपणे वापर करून शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवेल. यामध्ये सोशल मीडिया, वेबसाइट्स आणि मोबाइल अॅप्सचा समावेश होतो.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे बळकटीकरण: DGIPR Maharashtra माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला Effective Use of Ai Technology PR अधिक प्रभावी बनवण्यासाठी प्रयत्न केले जातील. यामध्ये आवश्यक साहित्य आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देणे समाविष्ट आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवीन धोरण आखणार Effective Use of Ai Technology PR
महाराष्ट्र शासनाच्या वतीने महत्वाचे पाऊल Effective Use of Ai Technology PR राज्य शासनाच्या शंभर दिवस आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा DGIPR Maharashtra आढावा घेतला. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, ‘माहिती व जनसंपर्क’चे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह आदी उपस्थित होते.
प्रधान सचिव तथा महासंचालक श्री. सिंह यांनी सादरीकरणाद्वारे DGIPR Maharashtra माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या १०० दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण केले.
https://dgipr.maharashtra.gov.in/
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या Effective Use of Ai Technology PR कामकाजात यापुढे कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यावर भर द्यावा. डिजिटल माध्यम धोरण तयार करून नवमाध्यमांचा प्रभावी वापर करून शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यात येणाऱ्या मान्यवरांना महाराष्ट्राचे विविध पैलू दर्शवणारे कॉफीटेबल बुक तयार करावे. राज्य शासन घेत असलेले निर्णय, योजना व उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत सर्व माध्यमांद्वारे जाणे आवश्यक आहे.
राज्य शासनाच्या प्रतिमा संवर्धनासाठी व माहिती पोहचविण्यासाठी Effective Use of Ai Technology PR एआय न्यूजरुम तयार करुन त्याद्वारे माहिती लवकरात लवकर प्रसारित करण्याचे नियोजन करावे. त्यासाठी आवश्यक साहित्य, मनुष्यबळ घेण्यात यावे. पत्रकारांसाठी असलेल्या आरोग्यविषयक तसेच इतर विविध कल्याणकारी योजनांना गती देण्यात यावी. पत्रकार पुरस्कारांचे लवकर वितरण करण्याचे नियोजन करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
राज्यस्तरावर संदर्भ कक्ष
शासकीय योजना, उपक्रम यांची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी Effective Use of Ai Technology PR राज्यस्तरावर संशोधन आणि संदर्भ कक्ष स्थापन करण्यात यावे. तसेच वर्तमानपत्रे व ईलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच डिजिटल माध्यमांद्वारेही योजना, निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी डिजिटल मीडिया धोरण लवकरच तयार करण्यात यावे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
– एआयच्या प्रभावी वापरावर भर
– माहिती जलदगतीने पोचविण्यासाठी यंत्रणा
– महासंचालनालयाच्या बळकटीकरणावर भर DGIPR Maharashtra
– सध्या अस्तित्वातील सर्व होर्डिंग हे डिजिटल होर्डिंगमध्ये बदलणार
– सोशल मिडियाचा प्रभावी वापर वाढविणार
– एकाच ठिकाणी माहिती उपलब्धतेसाठी संशोधन आणि संदर्भ कक्ष Research and Reference Section