Fast Tag सर्व वाहनांसाठी फास्ट टॅग अनिवार्य

1 एप्रिल 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी

Fast Tag

Fast Tag राज्यातील चार चाकी वाहन धारकांना एक एप्रिलपासून फास्ट टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

बातमी दृष्टीक्षेपात

  • फास्ट टॅग अनिवार्य: 1 एप्रिल 2025 पासून राज्यातील सर्व चार चाकी वाहन धारकांसाठी फास्ट टॅग अनिवार्य होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
  • लाभ: या निर्णयामुळे वाहतूक कोंडी टळून इंधनाची आणि वेळेची बचत होईल.
  • दुप्पट शुल्क: फास्ट टॅग कार्यरत नसेल तर वाहन धारकांना पथकर शुल्काच्या दुप्पट शुल्काचे भरणे करावे लागेल.
  • इतर पेमेंट पद्धती: रोख रक्कम, स्मार्ट कार्ड, क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा इतर माध्यमातून पथकर शुल्क भरल्यास देखील दुप्पट शुल्क आकारले जाईल.
  • टोल नाके: एमएसआरडीसीच्या ५० टोलनाक्यांवर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २३ टोलनाक्यांवर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल.

https://sarkaribatmya.in/upsc-interview-training-2024/

1 एप्रिल 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. या निर्णयामुळे वाहतूक कोंडी टळून इंधनाची आणि वेळेची देखील बचत होणार आहे.

फास्ट टॅग नसल्यास दुप्पट शुल्क Fast Tag mandatory for all vehicles

फास्ट टॅग कार्यरत नसेल तर वाहन धारकाला पथकर शुल्काच्या दुप्पट शुल्क भरावे लागेल.  त्याचप्रमाणे रोख रक्कम, स्मार्ट कार्ड, क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा कोड किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे पथकर शुल्क भरायचे असेल तरी देखील दुप्पट पथकर शुल्क भरावे लागेल.

MSRDC अखत्यारीत ५० टोलनाके असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यात २३ टोल नाके आहेत. या नाक्यांवर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

सरकारी बातम्या आणि निवडणुकीविषयीचे UPDATE मिळवण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा.

https://chat.whatsapp.com/CHchLd9jdqz2fy0m6ph0sK

Leave a Comment