अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाखांची मदत
Compensation Grant Approved for ASHA Workers
आरोग्य विभागाचा महत्वाचा घटक आहे आशा सेविका आणि गट प्रवर्तक. या आशा सेविकांमुळे आरोग्य विभागाचे फिल्ड वरचे कार्य अधिक सोपे होते. Compensation Grant Approved for ASHA Workers अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या या आशा सेविकांसाठी आता महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आशा सेविकांना कार्य बजावत असतांना अपघाती अपंगत्व आल्यास 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. या बरोबरच कार्य बजावताना जर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांना 10 लक्ष रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. या संदर्भात घेतलेला निर्णय सविस्तर वाचा.
संक्षिप्त बातमी
– प्रस्तावित सानुग्रह अनुदान:
– अपघाती मृत्यू: रु. 10 लाख
– कायमस्वरुपी अंपगत्व: रु. 5 लाख
– संबंधित विभाग:
– सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश
– निर्णयाची अंमलबजावणी:
– निर्णय 1 एप्रिल, 2024 पासून लागू होईल
– आवर्ती निधी:
– प्रति वर्ष अंदाजित रु. 1.05 कोटी मंजूर
– आवश्यक निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करणे
– आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची भूमिका:
– आरोग्य जागरूकता, सुसंवाद, समन्वय, आणि प्रोत्साहन निर्माण करणे
– नियमित गृहभेटी देणे, मार्गदर्शन करणे, रुग्णांना संदर्भित करणे

मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पाठपुराव्याला यश
या संदर्भातला निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या एका बैठकीत झाला. या निर्णया नुसार १ एप्रिल, २०२४ पासून हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती आहे. Compensation Grant Approved for ASHA Workers याबाबत महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत हे सातत्यांयाने पाठपुरावा करत होते, अखेर त्यांनी सततच्या केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
शासनादेश निर्गमित
या संदर्भातील महाराष्ट्र शासनाचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेता कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास रु.10 लक्ष रुपये देण्याबाबत शासन निर्णयात नमूद केले आहेत. या सह अपघातामुळे कर्तव्यावर असताना कायमस्वरुपी अंपगत्व आल्यास रु.5 लक्ष रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी मान्यता देण्यात आल्याचे या शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.
भरघोस निधीची तरतूद
या सर्व सानुग्रह अनुदानासाठी विशेष निधीची तरतूद करण्याची गरज होती. परिणामी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने वर्षाकाठी अंदाजित 1.05 कोटी रुपयांचा आवर्ती निधी मंजूर केला असल्याची माहिती यावेळी आरोग्य मंत्री सावंत यांनी दिली आहे. Compensation Grant Approved for ASHA Workers सदर सानुग्रह अनुदानासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करुन देण्यासंदर्भात मान्यता मिळाली आहे, परिणामी आता यासाठी भरघोस निधी उपलब्ध झाला आहे.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्यासाठी महत्वपूर्ण निर्णय
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप पाहता हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे. किंबहुना आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अनेकदा अघटीत घटना घडू शकतात.Compensation Grant Approved for ASHA Workers परिणामी या आशा सेविकांना आणि गट प्रवर्तकांना अपघात झाल्या नंतर अपघातामुळे घ्याव्या लागणाऱ्या उपचारांसाठी कसलीही मदत दिली जात नव्हती.
अपघाती मृत्यू आल्यास रु.10 लक्ष व कायमस्वरुपी अंपगत्त्व आल्यास रु.5.०० लक्ष इतके सानुग्रह अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.Compensation Grant Approved for ASHA Workers अखेर आशा सेविकांच्या या समस्येवर तोडगा निघाला असून शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वतीने निर्गमित करण्यात आला आहे.
कोरोना साथरोगाच्या काळात महत्वपूर्ण योगदान
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे राज्याच्या आरोग्य सेवेत महत्वाचे योगदान आहे. कोरोना सारख्या जीवघेण्या साथीच्या आजारातही आशा स्वयंसेविकांनी अनमोल भूमिका बजावली होती. राज्यातील आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था व ग्रामस्थ, समाजातील अन्य घटक यांमध्ये आरोग्यासंदर्भात सर्व समावेशक काम करण्याची महत्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे. आणि हे कार्य ते सातत्याने करत आलेल्या आहेत.
राज्यातील आशा स्वयंसेविकां माता आरोग्य, बाल आरोग्य, कुटुंब नियोजन इत्यादी कारणांसाठी नियमित गृहभेटी देत असतात. तसेच बालकांना व मातांना मार्गदर्शन करत असतात. परिस्थिती नुसार रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय, येथे रेफर करणे अशा महत्वाच्या कार्यात या स्वयं सेविकांचे अविभाज्य योगदान असते.
महत्वपूर्ण सामाजिक दुवा
आरोग्य विषयक जागरुकता, समजात आरोग्या विषयी जागरूकता सुसंवाद, सर्वसमावेशक समन्वय, आणि प्रोत्साहन, निर्माण करण्याचे निरंतर कार्य त्या करतात. Compensation Grant Approved for ASHA Workers शासनाच्या या निर्णयाने राज्यभरातील आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांनी आनंद व्यक्त केला असून त्यांच्यासाठी हा महत्वाचा निर्णय असल्याची भावना समाजातून उमटली आहे. “आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक” महत्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत असून त्यांचा सार्थ अभिमान आहे.
हेही वाचा >>> https://sarkaribatmya.in/empowered-c-a-developed-india/
फॉलो करा फेसबुक पेज >>> https://www.facebook.com/profile.php?id=61556645477169