बेपत्ता मुलींच्या शोधासाठी ‘ऑपरेशन मुस्कान’ महिलांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना Operation Muskan measures for women’s safety

राज्यभर महिला सहाय्य कक्षांची स्थापना

Operation Muskan measures for women’s safety

देशात आणि राज्यभर सध्या महिलांच्या Operation Muskan measures for women’s safety सुरक्षिततेबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित होईल अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. राज्यात आठ दिवसात अशा घटनांनी हादरवून सोडलं आहे. या घटनांना आळा बसावा यासाठी म्हणून महाराष्ट्र शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. महिला सहाय्य कक्षाची स्थापना. जलदगती न्यायालये, महिलांच्या सुरक्षिततेसाठी पेट्रोलिंग,ऑपरेशन मुस्कान सारख्या अनेक उपाययोजना सरकारने केल्या आहेत.

बातमी दृष्टीक्षेपात

महिलांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना:

महिला सहाय्य कक्षांची स्थापना:
– सर्व पोलीस आयुक्तालये आणि पोलीस अधीक्षक स्तरावर महिला सहाय्य कक्ष.
– सर्व पोलीस ठाणे स्तरावर महिला पोलीस कक्ष सज्ज.
– महिला सुरक्षा समित्यांची स्थापना.

अत्याचारानंतर जलद न्याय: Operation Muskan measures for women’s safety
– 27 विशेष न्यायालये, 86 जलदगती न्यायालये कार्यरत.
– बलात्कार व पोस्को कायद्यांतर्गत 20 पोस्को आणि 12 जलदगती न्यायालये कार्यरत.
– अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यांतर्गत एक विशेष न्यायालय.

सुरक्षिततेसाठी गस्त आणि पेट्रोलिंग:
– दामिनी पथकाद्वारे शाळा, महाविद्यालये, गर्दी आणि निर्जनस्थळी गस्त.
– पोलीस काका आणि पोलीस दीदीच्या नियुक्तीसह अल्पवयीन मुलींसाठी विशेष पाऊले.
– निर्भया पथक आणि भरोसा सेलचे उपक्रम.

समुपदेशन आणि मदत:
– 124 समुपदेशन केंद्रांची स्थापना.
– डायल 112 द्वारे तातडीने मदत पुरवली जाते.

बलात्कार गुन्ह्यांची निर्गती:
– ITSSO यंत्रणेद्वारे गुन्ह्यांची 60 दिवसांत निर्गती.
– 2020 मध्ये 45.5% ते 2024 मध्ये 92% पर्यंत निर्गती प्रमाणात वाढ.

मुंबई शहर सुरक्षा प्रकल्प (निर्भया योजना):
– केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून कार्यरत.
– 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ.
– पोलिस आयुक्त मुंबई अंमलबजावणी यंत्रणा म्हणून कार्यरत.
– गर्दी, संवेदनशील ठिकाणांची निगराणी, समाज माध्यमांचा दुरूपयोग व सायबर न्यायवैद्यक.

ऑपरेशन मुस्कान: Operation Muskan measures for women’s safety
– बेपत्ता मुलींच्या शोधासाठी त्वरित कार्यवाही.
– 2023 मध्ये 1440 मुला-मुलींचा शोध.
– मिसींग पथक आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाद्वारे शोध.

सरकारी बातम्या आणि निवडणुकीविषयीचे UPDATE मिळवण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा.
Operation Muskan measures for women's safety

बेपत्ता मुलींच्या शोधासाठी ऑपरेशन मुस्कान

शहरात बेपत्ता झालेल्या मुलींची माहिती प्राप्त होताच तत्काळ दखल घेवून त्वरित प्रभावाने कार्यवाही करण्यात येत आहे. त्यासाठी ऑपरेशन मुस्कान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून सन 2023 मध्ये 1440 मुले / मुलींचा शोध घेण्यात आला आहे. बेपत्ता मुलींच्या शोधासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये मिसींग पथक नेमण्यात आले आहे. Operation Muskan measures for women’s safety तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा यांच्याद्वारे बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.

महिलांवर अत्याचार होवूच नयेत यासाठी शासन तत्परतेने कार्यवाही करीत आहे. मात्र, दुर्देवाने अत्याचार झाल्यास पीडित महिलेला जलद गतीने न्याय मिळण्यासाठी 27 विशेष न्यायालये, 86 जलदगती न्यायालये कार्यरत आहेत. बलात्कार व पोस्को कायद्यांतर्गत प्रलंबित प्रकरणे चालवून त्वरित निकाली काढण्यासाठी 20 पोस्को व 12 जलदगती न्यायालये कार्यरत आहेत. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यांतर्गत एक विशेष न्यायालय देखील कार्यरत आहे.

राज्यात महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटनांवर प्रतिबंध आणून सुरक्षिततेसाठी शासन कार्यवाही करीत आहे. राज्य शासन गृह विभागाच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षेकरीता विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करीत आहे.सर्व पोलीस आयुक्तालये व पोलीस अधीक्षक स्तरावर घटक प्रमुख स्तरावर महिला सहाय्य कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच सर्व पोलीस ठाणे स्तरावर महिला पोलीस कक्षही सज्ज करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महिला सुरक्षा समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

बलात्काराच्या गुन्ह्यांची निर्गती करण्याचे वाढते प्रमाण

बलात्काराच्या गुन्ह्यांची निर्गती करण्यासाठी ITSSO (Investigation Tracking System for Sexual Offences) यंत्रणा राबविण्यात येत आहे. या गुन्ह्यांची 60 दिवसांत निर्गती करण्याचे प्रमाण वाढले आहे. सन 2020 मध्ये हे प्रमाण 45.5 टक्के इतके होते, तर सन 2021 मध्ये 57.8, सन 2022 मध्ये 73.02 व सन 2023 मध्ये 91.01 टक्यापर्यंत वाढले आहे. तसेच सन 2024 मध्ये 24 जून 2024 पर्यंत 92 टक्के निर्गती करण्याचे प्रमाण आहे. या गुन्ह्यांमध्ये अधिक निर्गती होण्याच्यादृष्टीने या कामाचा वरिष्ठ स्तरावरून नियमित आढावाही घेण्यात येतो.

मुंबई शहर सुरक्षा प्रकल्प

सार्वजनिक ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांवर परिणामकारकरीत्या आळा घालण्याच्या दृष्टीने व त्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मुंबई शहर महिला सुरक्षितता पुढाकार योजना (निर्भया) राबविण्यात येत आहे. या योजनेच्या निधीमध्ये केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा 60 आणि 40 टक्के असा आहे. या योजनेच्या अंमलबजावणीस केंद्र शासनाने 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

योजनेकरीता पोलिस आयुक्त, मुंबई हे अंमलबजावणी यंत्रणा म्हणून कार्य करीत आहे. Operation Muskan measures for women’s safety या योजनेंतर्गत गर्दी व संवेदनशील ठिकाण, मागोवा व निराकारण, समाज माध्यमांचा दुरूपयोग करणाऱ्यांचा शोध घेणे, सायबर न्यायवैद्यक व मोबाईल डाटा टर्मिनल विकसित करण्यात येत आहे. पोलीस दीदी व महिला सुरक्षाविषयक जनजागृती करण्यात येत आहेत. मदत व पुनर्विलोकन कक्ष, प्रतिसाद वाहने यांची खरेदीही करण्यात येत आहे.

शाळा व महाविद्यालय परिसरात, गर्दी व निर्जनस्थळी दामिनी पथकाद्वारे रस्ते गस्त, दुचाकी, चार चाकी वाहनांद्वारे पेट्रोलिंग करून गुन्ह्यांना प्रतिबंध केला जात आहे. कम्युनिटी पोलिसिंग उपक्रमांतर्गत अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार रोखण्याकरीता पोलीस काका तसेच पोलीस दीदी नेमण्यात आले आहेत. निर्भया पथक, भरोसा सेल यासारखे उपक्रमही राबविण्यात येत आहे.

Operation Muskan measures for women’s safety  महिला व मुलीच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध करण्यासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. महिलांच्या समुपदेशनासाठी   124 समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. तसेच डायल 112 च्या माध्यमातून तातडीने मदत पुरविण्यात येत आहे.

हेही वाचा >>> https://sarkaribatmya.in/savitribai-phule-pune-university-top-rank-india/

फॉलो करा फेसबुक पेज >>>  https://www.facebook.com/profile.php?id=61556645477169

Leave a Comment