उच्च शिक्षण विभागाकडून मदतीसाठी पोर्टलचीही सुविधा
Free Higher Education Helpline for Girls
महाराष्ट्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील Free Higher Education Helpline for Girls मुलींना आता मोफत उच्चशिक्षण मिळणार आहे. त्यामुळे अत्यंत गरीब आणि सामान्य कुटुंबातील मुलगी उच्चशिक्षणापासून वंचित राहणार नाही. पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण या उच्च शिक्षणासाठी कोणी अडवत असेल अथवा, शैक्षणिक संस्था आर्थिक बाबींसाठी अडवत असतील तर या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने विशेष हेल्पलाईन क्रमांक आणि आणि पोर्टल उपलब्ध करून दिले आहे, सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.
बातमी दृष्टीक्षेपात
– उच्च शिक्षणाची संधी: नवीन शैक्षणिक धोरणानुसार New Educational Policy मुलींना मोफत व्यावसायिक उच्च शिक्षण मिळविण्याची संधी.
– हेल्पलाइन संपर्क: उच्च शिक्षण विभागाच्या हेल्पलाइन क्रमांकावर 0796134440 आणि 07969134441 संपर्क साधावा.
– ऑनलाईन पोर्टल सुविधा: शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी https://mahadbt.maharashtra.gov.in पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा.
– आर्थिक सहाय्य: वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या पालकांच्या मुलींचे शिक्षण पूर्णपणे मोफत.
– अडचणीसाठी मदत: शैक्षणिक अर्ज किंवा योजनेशी संबंधित समस्यांसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, विभागीय नोडल अधिकारी किंवा महाआयटीच्या पोर्टलवरील Grieviance Section मध्ये नोंद करावी.
– भरणा परतावा: प्रवेशासाठी भरलेल्या पैशांचे परतावे मिळवण्यासाठी बॅंक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक.
– शिष्यवृत्ती योजना: मंजूर शिष्यवृत्ती दोन टप्प्यात बँक खात्यात जमा केली जाईल, आणि विद्यार्थीनी एकाच योजनेंतर्गत लाभ मिळवू शकते.
– अधिकृत संकेतस्थळे: योजनेची माहिती आणि अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल, उच्च शिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ, तंत्र शिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ, आणि कला संचालनालयाचे संकेतस्थळ उपलब्ध आहे.
नवे शैक्षणिक धोरण जाणून घ्या
नवीन शैक्षणिक धोरणानुसार New Educational Policy (NEP) व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे आणि मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. मुलींना मोफत उच्च शिक्षणाबाबत काही समस्या असल्यास उच्च शिक्षण विभागाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.पाटील म्हणाले, कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या मुलींना या निर्णयामुळे निश्चितच मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
मुलींना मोफत उच्च शिक्षणाबाबत समस्या आल्यास हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा
वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या पालकांच्या मुलींचे पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मोफत देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेताना विद्यार्थिनींना काही अडचणी आल्यास त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने हेल्पलाईन क्रमांक व हेल्प डेस्क सुरू केला आहे. ही हेल्पलाईन 0796134440, 07969134441 या क्रमांकावर आणि helpdesk.maharashtracet.org यावर संपर्क करावा. ही हेल्पलाईन कार्यालयीन दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यत कार्यरत आहे. या हेल्पलाईनचा उपयोग करण्याचे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री Minister Chandrakant Patil चंद्रकांत पाटील यांनी केले आहे
खालील पोर्टल वर करता येणार ताक्रार
Minister Chandrakant Patil मंत्री श्री.पाटील म्हणाले, या योजनेसाठी https://mahadbt.maharashtra.gov. in पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशत: अनुदानित (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानित महाविद्यालये / तंत्रनिकेतने/सार्वजनिक विद्यापिठे, शासकीय अभिमत विद्यापीठे (खाजगी अभिमत विद्यापीठे/स्वयं अर्थ सहाय्यित विद्यापीठे वगळून) व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्याक्रमांना प्रवेश घेणाऱ्या मुलींना वार्षिक शैक्षणिक व परीक्षा शुल्क या योजनेद्वारे 100 टक्के मोफत करण्यात आले आहे.
शिक्षणासाठी भरलेले पैसे देखील परत मिळणार
शैक्षणिक वर्ष सन 2024-25 व त्यापूर्वी ज्या मुलींनी प्रवेश घेतलेला आहे, सध्या विविध शैक्षणिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या मुलींना अशा सर्व पात्र मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. New Educational Policy ज्या विद्यार्थीनींनी प्रवेशासाठी पैसे भरले असतील त्यांना भरण्यात आलेले पैसे परत करण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र मुलींना रक्कम प्राप्त करुन घेण्यासाठी त्यांचे बॅंक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे गरजेचे आहे.
Grieviance Section मध्ये तक्रारीची सोय
या योजनेचा अर्ज भरताना काही समस्या आल्यास संबधित महाविद्यालयाचे प्राचार्य/नोडल अधिकारी, विभागीय सहसंचालक कार्यालयातील नोडल अधिकारी किंवा महाआयटीच्या पोर्टलवरील Grieviance Section मध्ये नोंद करावी. या योजनेची माहिती महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra. gov.in, उच्च शिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ https://dhepune.gov.in, तंत्र शिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ https://www.dtemaharashtra.gov.in, कला संचालनालयाचे https://doa.maharashtra. gov.in या सर्व अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
New Educational Policy मंजूर शिष्यवृत्ती सत्रनिहाय दोन टप्प्यात बँक खात्यात जमा केली जाणार आहे. शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांपैकी केवळ कोणत्याही एकाच योजनेंतर्गत लाभ मिळण्यास संबंधित विद्यार्थीनी पात्र असणार आहे Free Higher Education Helpline for Girls, असेही मंत्री श्री.पाटील Minister Chandrakant Patil यांनी सांगितले.
हेही वाचा >>> https://sarkaribatmya.in/savitribai-phule-pune-university-top-rank-india/
फॉलो करा फेसबुक पेज >>>https://www.facebook.com/profile.php?id=61556645477169