‘सेफ वेब फॉर चिल्ड्रन’ कार्यक्रमाच्या उद्घाटनात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंचे प्रतिपादन
SAFE WEB F0R CHILDREN
लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे ही पालकांची जबाबदारी आहे. मुलांना इंटरनेटमुळे जगभरातल्या ज्ञानाची कवाडे खुली झाली आहेत. परंतु लहान मुलांविरोधातील गुन्हेगारीही वाढली आहे. SAFE WEB F0R CHILDREN त्यातूनच ऑनलाईन माध्यमातून होणारे मुलांचे लैंगिक शोषण रोखणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे Aditi Tatkare यांनी केले.
संक्षिप्त SAFE WEB F0R CHILDREN
– महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे Aditi Tatkare यांनी लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे पालकांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले.
– सेफ वेब फॉर चिल्ड्रन’ कार्यक्रमाचे उद्घाटन सह्याद्री अतिथीगृह येथे झाले.
– उपस्थिती राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अध्यक्ष ॲड. सुशीबेन शाह, महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, एकात्मिक बाल विकास योजना आयुक्त कैलास पगारे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, चाइल्ड फंड इंडियाचे राजेश रंजन सिंग यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
वेब सुरक्षा संबंधित जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता
– सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या वापरामुळे प्रायव्हसी कमी होत आहे आणि हॅकर्स फसवणूक करत आहेत.
– पालकांनी लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचे लक्षात ठेवावे, कारण मोबाइलच्या वापरामुळे मुलांना सोशल मीडियावर सहज प्रवेश मिळतो.
– मंत्री कु. तटकरे यांनी या उपक्रमाला महिला व बालविकास विभागातर्फे पाठबळ देण्याची ग्वाही दिली.
– श्रीमती शाहा यांनी वेब सुरक्षा संबंधित जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता व्यक्त केली.
– उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे सायबर क्राईमचे प्रमाण कमी करणे आणि मुलांचे ऑनलाईन शोषण रोखणे.
– कार्यक्रमात विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व चाईल्ड फंड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व चाईल्ड फंड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेफ वेब फॉर चिल्ड्रन’ (SAFE WEB FOR CHILDREN) या कार्यक्रमाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
हॅकर्स सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक करत आहेत
SAFE WEB F0R CHILDREN महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे Aditi Tatkare म्हणाल्या, सोशल मीडिया, इंटरनेटच्या वापरामुळे आपले आयुष्य जसजसं सोप होत आहे, तशीच आपली प्रायव्हसी त्यामुळे कमी होत आहे. हॅकर्स सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन मार्गांनी फसवणूक करत आहेत. सोशल मीडिया, इंटरनेट Internet आणि नवे तंत्रज्ञान Technology याचा सुरक्षितरित्या वापर करणे आवश्यक आहे. लहान मुलेही इंटरनेट वापरत असल्यामुळे त्यांच्या पालकांपर्यंत पोहचून सायबर क्राईमबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.
मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे ही पालकांची जबाबदारी
सध्या लहान मुलांकडे स्वतःचा मोबाईल नसला, तरी मुलांना गप्प बसवण्यासाठी म्हणून पालक स्वतःचा मोबाईल मुलांना देतात. SAFE WEB F0R CHILDREN यामुळे मुलांना सोशल मीडियावर सहज प्रवेश मिळतो. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे ही पालकांची जबाबदारी आहे, असे सांगून मंत्री कु. तटकरे Aditi Tatkare म्हणाल्या की, राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व चाईल्ड फंड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारा हा कार्यक्रम खरोखरच स्तुत्य आहे. महिला व बालविकास विभागातर्फे या उपक्रमाला पाठबळ देण्यात येईल, असेही तटकरे यांनी यावेळी सांगितले.
मुलांनी इंटरनेट चा सुरक्षितरित्या आणि इंटरनेट चा योग्यप्रकारे वापर कसा करावा यासाठी जागरूकतेची गरज
श्रीमती शाहा Sushiben Shaha प्रास्ताविकात म्हणाल्या, लहान मुले, महिला आणि पालक यांच्यात वेब सुरक्षा याविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मुलांनी इंटरनेट चा सुरक्षितरित्या आणि इंटरनेट चा योग्यप्रकारे वापर कसा करावा यासाठी मुलांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आहे.
सायबर क्राईमचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. SAFE WEB F0R CHILDREN राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व चाईल्ड फंड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांच्या हक्कांचे संरक्षण आणि मुलांचे ऑनलाईन लैंगिक शोषण व गैरवर्तन यापासून संरक्षण करणे या उद्देशाने मुलांसाठी ऑनलाईन सुरक्षिततेचा उपक्रम राज्यात राबविण्यात येणार असल्याचे शाहा यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या मध्यामातून महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभाग यांच्या मार्फत मुलांमध्ये समाज माध्यमे कशी हाताळावीत, तसेच समाज माध्यमांमध्ये फसवणूक कशी होऊ शकते व त्यापासून सावध कसे राहावे अशा आशयाची जनजागृती करण्यास सरकार प्रायात्नशील आहे.
हेही वाचा >>> https://sarkaribatmya.in/13-to-15-augst-har-ghar-tiranga-campaign/
https://sarkaribatmya.in/excellent-public-ganesh-festival-award/
https://sarkaribatmya.in/yashaswini-e-commerce-economic/
फॉलो करा फेसबुक पेज >>>https://www.facebook.com/profile.php?id=61556645477169