बचतगटांच्या उत्पादनाला मिळणार हक्काची बाजारपेठ
Yashaswini E-Commerce
महिला व बालविकास मंत्री यांच्या हस्ते उद्घाटन
Yashaswini E-Commerce महिला बचतगटांच्या उत्पादनाला हक्काची बाजरपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या Women and Child Development Department माध्यमातून महिला बचतगटांसाठी यशस्विनी ई-कॉमर्स Yashaswini E-Commerce प्लॅटफॉर्म हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते या प्लॅटफॉर्मच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले.
माहाराष्ट्र शासनाचा महिला व बालविकास विभाग सातत्याने महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या स्वावलंबी होण्याकरिता प्रयत्न करत असते. महिला बचत गटात विविध उत्पादने मोठ्या मेहनतीने तयार करतात, परंतु हि उत्पादने विकायची कुठे हा इष्ट प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो.
यासाठीच यशस्विनी ई-कॉमर्स हा ऑनलाईन संकेतस्थळ सुरु केले असून आता महिलांना त्यांच्या उत्पादनाची मोफत जाहिरात करण्याबरोबरच त्यांच्या उत्पादनांना रास्त भाव मिळण्यासाठी एक महत्वाचा दुआ मिळाला आहे.
– यशस्विनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचे उद्घाटन:
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन.
– उद्देश:
महिला बचतगटांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ प्रदान करणे आणि आर्थिक उन्नतीसाठी एक नवा मार्ग उघडणे.
–महत्त्व:
ऑनलाईन शॉपिंगच्या वाढत्या महत्वामुळे महिलांना खास बाजारपेठ मिळवण्याची आवश्यकता.
– उत्पादन उपलब्धता:
ग्रामीण, आदिवासी आणि शहरी भागातील बचतगटांच्या नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार उत्पादने यशस्विनी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार.
– जाहीरातीचा अभाव:
महिलांच्या उत्पादने जाहीरातीच्या अभावामुळे विकली जात नव्हती किंवा योग्य बाजारभाव मिळत नव्हता.
– प्लॅटफॉर्मची सुविधा:
– बचत गटांनी आपले नाव नोंदणी करू शकतात.
– उत्पादनाचे फोटो अपलोड करणे आणि किंमती व गुणवत्तेची जाहिरात करण्यासाठी डॅशबोर्ड व्यवस्था.
– उत्पादन पॅकींग, वाहतूक, साठवणूक आणि हाताळणी याविषयी माहिती.
– वित्तीय व्यवस्था:
विक्री झाल्यानंतर ऑनलाइन रक्कम खात्यात जमा होईल.
– अवश्यक माहिती :
प्लॅटफॉर्म सर्व जनतेसाठी उपलब्ध असून नागरिकांनी https://yashaswini.org/launch.html या लिंकला भेट देण्याचे आवाहन.
मंत्री आदिती तटकरे Aditi Tatkare म्हणाल्या की, भारताच्या रिटेल क्षेत्रात ऑनलाईन शॉपिंग महत्वाची भुमिका निभावत आहे. सध्या करोडो रुपयांची देवाण घेवाण ऑनलाईन शॉपिंग प्लटफॉर्मद्वारे केली जात आहे. यामध्ये महिला बचतगटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हा पथदर्शी उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
यामुळे राज्यातील Government of Maharashtra ग्रामीण, आदिवासी, शहरी अशा हजारो बचतगटांनी तयार केलेली नाविन्यपूर्ण, दर्जेदार उत्पादने यशस्विनी ई -कॉमर्स E-Commerce प्लटफॉर्मवर आता उपलब्ध होणार असून महिला बचत गटांना आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग उपलब्ध होणार आहे.
जाहीरातीच्या आभावी अनेकवेळा महिला बचत गटांचे उत्पादने विकली जात नाहीत किंवा त्यांना योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यासाठी महिला व बाल विकास विभागाचे Women and Child Development Department आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी या अभिनव कल्पनेच्या माध्यमातून यशस्विनी ई- कॉमर्स प्लॅटफॉर्म विकसित केला आहे.
यामध्ये बचत गटांना खरेदी किंवा विक्री करण्याकरिता सहज आपले नाव नोंदणी करता येणार आहे. तसेच बचत गटांच्या उत्पादनाचे फोटो अपलोड करता येणार आहेत तसेच त्यांच्या किंमतीची व गुणवत्तेची जाहिरात करण्यासाठी सुद्धा यामध्ये डॅशबोर्ड व्यवस्था करण्यात आली आहे.
वस्तूंची विक्री झाल्यानंतर त्यांच्या खात्यात आँनलाईन रक्कम जमा होण्याची व्यवस्था
बचतगटांना उत्पादन पॅकींग, वाहतूक, साठवणूक करणे, योग्य हाताळणी करणे या विषयी माहिती देण्यात आली आहे. महिला बचतगटांनी उत्पादन केलेल्या वस्तूंची विक्री झाल्यानंतर त्यांच्या खात्यात आँनलाईन रक्कम जमा होण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यशस्वीनी प्लॅटफार्म सर्व जनतेसाठी उपलब्ध असून नागरिकांनी https://yashaswini.org/launch.html या प्लॅटफॉर्मला आवश्यक भेट द्यावी, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.
या प्लॅटफार्म च्या मध्यामातून मसाले, हस्त शिल्प, ककटलेरी सारखे इतर विविध प्रकारचे उत्पादने या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहेत.
हेही वाचा >>> https://sarkaribatmya.in/maharashtra-state-library-awards-2022-23/
फॉलो करा फेसबुक पेज >>> https://www.facebook.com/profile.php?id=61556645477169