भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 18 वर्षे पूर्ण तरुणांनी मतदार नोंदणी करावी Voter Registration Assembly Election
18 आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०२४ च्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. 18 Voter Registration Assembly Election या कार्यक्रमानुसार राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रनिहाय असलेल्या याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम निर्धारित करून देण्यात आलेला आहे.
दि. ०१ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर वयाची १८ वर्षे पूर्ण आवश्यक
Voter Registration Assembly Election या पुनरिक्षण कार्यक्रमानुत्तार दि. ०१ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर वयाची १८ वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा नागरिकांची मतदार नोंदणी करणे, जे नागरिक नव्याने मतदारसंघात वास्तव्यास आले आहेत अशा नागरिकांची त्यांच्या मूळ मतदार संघातून स्थलांतर करून मतदार नोंदणी करणे, या मतदारसंघातून अन्य मतदारसंघात वास्तव्याकरिता स्थलांतरित झाले आहेत, अशा मतदारांची वगळणी करणे अपेक्षित आहे.
सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये त्या संस्थेतील रहिवाशांसाठी विशेष मतदार नोदणी
१७९- सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या मतदारसंघातील प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये त्या संस्थेतील रहिवाशांसाठी विशेष मतदार नोदणी Voter Registration Assembly Election शिबिर आयोजित करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात प्रतिक्षानगर विभागातील टी-१ ते टी-६७. एमआयजी – १ ते १२, एलआयजी १ ते १२, एचआयजी १ ते १२, बहुमजली इमारती क्र. १ ते २०, जुनी इमारत क. २ ते ६. आणि अल्मेडा कंपाऊंड सह म्युनिसिपल कॉलनीतील सर्व अशा एकूण १५० इमारतीमधील नागरीकांची नोदणी करण्यात येणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मोहीम
१७९ सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयादीमध्ये प्रतिक्षानगर विभागातील बहुतांश मतदारांचा पत्ता चाळीमधील आहे, ज्या प्रत्यक्षात अस्तित्वात नसून या ठिकाणी बहुमजली इमारती आहेत. या विशेष नोंदणी शिबिरामध्ये प्रतिक्षानगरमधील सर्व रहिवासी मतदारांची मतदारयादीतील नोंदीमध्ये चाळींऐवजी त्या-त्या इमारतीचा पता नमूद करण्यात येणार आहे. त्याकरिता नवमतदारांकडून नमुना नं -६, मतदारयादीत नाव आहे. तथापी, पत्त्यात बदल आहे. अशा मतदारांकडून् नमुना नं ८ आणि मयत / कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदारांच्या नातेवाईकांकडून नमुना नं.७ जमा करुन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार याबाबत मोहीम राबविण्यात येत आहे. सदर नोंदणी प्रक्रियेचा समस्त नव युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे.
सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेवून त्यांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी यांची निवड करुन याकामी क्षेत्रीय स्तरावरील कामकाज करणा-या कर्मचा-यांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रतिक्षानगरमधील सर्व सहकारी सोसायटीच्या अध्यक्ष व सचिव यांना या मोहिमेबद्दल सोशल मीडिया आणि भित्तीपत्रके आणि पत्राव्दारे व्यापक माहिती देण्यात आली आहे.
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी समन्वय साधण्याचे आवाहनसहकारी संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९अ नुसार मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक म्हणून घोषित करण्यात आले असून सहकारी सोसायटी सदस्यांसाठी मतदार नोंदणी करणे, मयत व स्थलांतरीत मतदारांची वगळणी करणे, याकरिता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी समन्वय साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे, असे 179-सायन कोळीवाडा विधानसभा मतदासंघाचे मतदार नोंदणी अधिकारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
– मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम: भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली द्वारे जाहीर.
– पुनरिक्षण कार्यक्रमानुसार अपेक्षित कार्य:
– ०१ जुलै २०२४ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेले नागरिकांची मतदार नोंदणी.
– नवीन मतदान केंद्रात वास्तव्यास आलेल्या नागरिकांची मतदार नोंदणी.
– अन्य मतदारसंघात स्थलांतरित झालेल्या मतदारांची वगळणी.
– १७९- सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघासाठी विशेष कार्यक्रम:
– प्रतिक्षानगर विभागातील विविध इमारतींमध्ये विशेष मतदार नोंदणी शिबिर आयोजित.
– शिबिरामध्ये १५० इमारतींमधील नागरिकांची मतदार नोंदणी करण्यात येणार आहे.
– मतदारयादीतील पत्ता सुधारणा:
– प्रतिक्षानगरमधील मतदारांची पत्त्याची चाळीऐवजी इमारतीचा पत्ता सुधारणे.
– नवमतदारांकडून नमुना नं -६ आणि मयत/स्थलांतरित मतदारांच्या नातेवाईकांकडून नमुना नं.७ जमा करणे.
– राजकीय पक्ष आणि सहकारी संस्थांची भूमिका:
– सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची निवड.
– क्षेत्रीय स्तरावरील कर्मचाऱ्यांना मदतीसाठी आवाहन.
–सहकारी संस्थांच्या अध्यक्ष व सचिवांना सूचना:
– सोशल मीडिया, भित्तीपत्रके, आणि पत्राव्दारे माहिती देणे.
– महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९अ नुसार मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक म्हणून घोषित.
– मतदार नोंदणी, मयत व स्थलांतरित मतदारांची वगळणी करण्यासाठी समन्वय साधणे.
– मतदार नोंदणी अधिकारी यांचे आवाहन:
– सहकारी संस्थांचे अध्यक्ष व सचिवांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी समन्वय साधण्याचे निर्देश.
हेही वाचा >>> https://sarkaribatmya.in/forts-include-world-heritage-list/
फॉलो करा फेसबुक पेज >>>https://www.facebook.com/profile.php?id=61556645477169