शोमिता विश्वास यांच्याकडे जबाबदारी सुपूर्द
1st Woman Principal Chief Forest Officer
राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) पदी प्रथमच महिला अधिकारी
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून अभिनंदन
1st Woman Principal Chief Forest Officer महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) Government of Maharashtra या पदाचा अतिरीक्त कार्यभार आज (दिनांक ३१ जुलै २०२४) रोजी श्रीमती शोमीता विश्वास, (भा.व. से.) यांनी मावळते प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) शैलेश टेंभूर्णीकर यांचेकडून नागपूर येथे स्वीकारला.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भारतीय वनसेवेतील वरिष्ठ अधिकारी
श्रीमती शोमीता बिश्वास (भावसे) या 1988 च्या बॅचच्या महाराष्ट्र राज्यातील Government of Maharashtra उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भारतीय वनसेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत. प्रधान मुख्य वनसंरक्षक पदी नियुक्ती होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. याबद्दल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी श्रीमती विश्वास यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याच्या Government of Maharashtra मुख्य सचिव, पोलिस महासंचालक या पदांपाठोपाठ आता वन विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक पदी महिला अधिकारी यांची नियुक्ती झाली आहे, ही गौरवाची बाब असल्याचे ते म्हणाले.
श्रीमती विश्वास यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम केल्याचा अनुभव
1st Woman Principal Chief Forest Officer प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) या पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी श्रीमती विश्वास यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महा कॅम्पा, महाराष्ट्र राज्य Government of Maharashtra नागपूर या पदावर काम केले आहे. राज्य आणि केंद्राशी कार्यक्षमतेने समन्वय साधत त्यांनी कॅम्पा योजना राज्यात अत्यंत प्रभावीपणे राबविलेली आहे.
केंद्र सरकार मध्ये देखील दीर्घ प्रशासकीय अनुभव
याशिवाय त्यांनी केंद्र सरकारमध्ये विविध वरिष्ठ पदावर काम केलेले आहे. त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय दिल्ली, सहसचिव कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार, दिल्ली या महत्त्वाच्या पदांचा समावेश होतो. राज्य व केंद्रीय स्तरावर अत्यंत महत्त्वाच्या विविध पदांवर काम केल्याने श्रीमती शोमीता बिश्वास यांना प्रशासन सक्षमतेने चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे.
प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) श्री. टेंभुर्णीकर आज सेवानिवृत्त 1st Woman Principal Chief Forest Officer
प्रधान मुख्य वनसंरक्षक Government of Maharashtra (वन बल प्रमुख) श्री. टेंभुर्णीकर आज सेवानिवृत्त झाले. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थान) श्रीनिवास राव, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प नियोजन व विकास) कल्याणकुमार, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा केंद्रस्थ अधिकारी नरेश झुरमुरे यांच्यासह भारतीय वनसेवा व महाराष्ट्र वनसेवेचे सर्व वरिष्ठ वनअधिकारी व कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रदीर्घ अनुभव असलेल्या पहिल्या महिला प्रधान मुख्य वनसंरक्षक यांचा प्रशासनातील प्रवास
– श्रीमती शोमीता बिश्वास
– 1988 च्या बॅचच्या महाराष्ट्र राज्यातील भारतीय वनसेवेतील वरिष्ठ अधिकारी.
– प्रधान मुख्य वनसंरक्षक पदावर नियुक्ती होणाऱ्या प्रथम महिला अधिकारी.
– वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
– राज्याच्या मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक या पदांपाठोपाठ, वन विभागातील महिलांची प्रधान मुख्य वनसंरक्षक पदी नियुक्ती झाली.
– कारकीर्द:
– प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महा कॅम्पा, नागपूर.
– कॅम्पा योजना राज्यात प्रभावीपणे राबवली.
– केंद्र सरकारमधील पदे:
– मुख्य कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय, दिल्ली येथे कार्यरत.
– सहसचिव, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार, दिल्ली येथे कार्यरत.
–अनुभव:
– राज्य व केंद्रीय स्तरावर अत्यंत महत्त्वाच्या पदांवर काम केल्यामुळे प्रशासन सक्षमतेने चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव.
माहितीपूर्ण बातम्यांसाठी फॉलो करा >>>https://www.instagram.com/?hl=en
https://www.facebook.com/profile.php?id=61556645477169
हेही वाचा >>> https://sarkaribatmya.in/detailed-cp-radhakrishnan-governor-of-maharashtra/